श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला ;माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत
(निलेश गायकवाड)
भिगवण, ता. 05 : मदनवाडी येथील श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल येथील वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. यामध्ये इयत्ता नर्सरी ते पाचवीमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थित झाले. या वेळी अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर उपस्थित होते.
दत्तात्रय भरणे यांनी शाळेसाठी दिला 20 लाख रुपयांचा निधी
भरणे यांनी शाळेसाठी तब्बल वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने भरणे यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सतीश शिंगाडे व उपाध्यक्ष भागवत मदने यांनी केला.व भूमिपूजन सोहळा पार पडला.
या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सुरवात गणेशाच्या नृत्याने झाली. इंग्रजी-मराठी एकांकिका, गीतगायन, पारंपारिक नृत्य, कोळीगीते, देशभक्तिपर गीते विद्यार्थ्यांनी सादर केली.
‘‘वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो. या माध्यमातून त्यांच्या कलागुणांचा गौरव शिक्षण संस्थेकडून केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व कौशल्याला वाव मिळतो. नेतृत्व गुण केवळ राजकीय क्षेत्रातच उपयोगी पडतात असे नाही, तर व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्रांतही त्यांचा चांगला उपयोग होतो,’’ असे मत भरणे यांनी या वेळी व्यक्त केले.
याप्रसंगी मदनवाडी ग्रामपंचायत सरपंच अश्विनी बंडगर,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश देवकाते , माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर,गटनेते संपत बंडगर,इंदापूर तालुका उपाध्यक्ष धनाजी थोरात, भिगवन ग्रामपंचायत सदस्य सचिन बोगावत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते अजिंक्य माडगे, पत्रकार निलेश गायकवाड,भिगवन ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच प्रदीप वाकसे, चेअरमन विष्णुपंत देवकाते, पोंधवडी ग्रामपंचायत चे माजी सरपंच नानासो बंडगर, रावसाहेब गवळी, प्रमोद नरुटे,उपसरपंच डॉ. तुळशीराम खारतोडे, सचिव विजय थोरात, माजी उपसरपंच जयदीप जाधव,माऊली मारकड तसेच पालक वा ग्रामस्थ उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव सीमा शिंगाडे ,मुख्याध्यापक मधुलता गोपाल क्रिष्ण, सोनवणे माधवी, राऊत सुवर्णा, रिद्धी शिंदे, सतीश सोनवणे, अभिलाषा अहिरवर , शकुंतला पवार आदींनी परिश्रम घेतले.तर संस्थेचे उपाध्यक्ष भागवत मदने यांनी आभार मानले.