June 30, 2025 4:35 pm

सार्वजनिक बांधकाम विभागाने कोर्टीमधील भवानी माते समोरील गटारीचे बांधकाम तात्काळ करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) – करमाळा तालुक्यामध्ये आवाटी ते कोर्टी या राज्य महामार्गाचे कामकाज पूर्ण झाले असून कोर्टी येथील भवानी माता मंदिराच्या शेजारील माने गल्लीतील रस्त्याच्या बाजूच्या गटारीचे कामकाज संबंधीत ठेकेदाराने केले नसल्याने कोर्टी येथील ग्रामस्थांनी सामुहिकरित्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता यांना लेखी तक्रार दि. 12/01/2024 रोजी दिलेली असून आजतागायत सदरच्या अर्जावर कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. याबाबत ग्रामस्थांशी मार्मिक समाचार चे प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आवाटी ते कोर्टी या राज्य मार्गाचे कामकाज पूर्ण झाले आहे परंतु ठेकेदाराने रस्त्याच्या साईडचे गटारीचे कामकाज केले नाही मेन रोडवरील, बाजारतळा जवळील, मराठी शाळेजवळील हा भाग असून या ठिकाणी एका बाजूची साईड गटार केलेली नाही. सदरच्या रस्त्यालगत अनेक कुटूंबाची पक्की घरे असून या ठिकाणाहून लहान मुलांपासून ते वयोवृध्दांपर्यंत सर्वांची ये जा असते. परंतु गटार न बांधलेने नागरिकांना जीव धोक्यात घालून घरा बाहेर पडावे लागत आहे. याबाबत ठेकेदार अधिकाऱ्यांनाही गांभीर्याने घेत नसल्याचा संताजनक आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. पुढे बोलताना ग्रामस्थ म्हणाले की, सदरची गटार एक महिन्यांच्या आंत बांधून न झाल्यास तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची व संबंधीत ठेकेदाराची राहील.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!