June 29, 2025 7:52 am

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नमो चषक कबड्डी स्पर्धेत सहभागी होऊन खेळाडूंना दिल्या शुभेच्छा

अपनी भाषा में पढ़े! Translate

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नमो चषक कबड्डी स्पर्धेत सहभागी होऊन खेळाडूंना दिल्या शुभेच्छा

प्रतिनिधी. भगवान लोंढे .. -माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नमो चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि इंदापूर व्यायाम मंडळ कबड्डी संघाच्या वतीने येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये नमो चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि.12 जानेवारी रोजी करण्यात आले होते. या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हर्षवर्धन पाटील यांनी उद्घाटनानंतर झालेल्या कबड्डी सामन्यात सहभागी होऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.


हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नमो चषक स्पर्धा संपूर्ण भारतभर ग्रामीण भागातील कला व क्रीडा क्षेत्रातील युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केली आहे. भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे त्यांचे सहकारी आणि इंदापूर व्यायाम मंडळ कबड्डी संघाने ही राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. खेळ आणि सांघिक भावना निर्माण करणे हे नमो चषक स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे .भारताची ओळख खेळातूनच निर्माण झाली असून आपण सर्वांनी या स्पर्धेला पाठिंबा द्यावा.
भाजपा युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख, निरा भिमा व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे ,सर सेनापती प्रतापराव गुजर यांचे तेरावे वंशज सयाजी नामदेव गुजर , विकास मोरे, रोहित पाटील , बापू जामदार ,रोहित नलवडे ,लखन पंडित , शेखर कोकाटे , सागर गानबोटे ,अमोल नरूटे, राहुल वलेकर, क्रीडा संचालक डॉ.भरत भुजबळ, क्रिडा शिक्षक बापू घोगरे यावेळी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!