अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी चेतन राजपुत यांची पुनश्च निवड..
तर सचिवपदी जितेंद्र ठाकुर व उपाध्यक्षपदी आर. जे.पाटील
अमळनेर : विक्की जाधव..
अमळनेर -अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेची बैठक दि 4 जानेवारी रोजी जि.प.विश्रामगृहात पार पडुन संघटनेच्या अध्यक्षपदी चेतन राजपुत यांची पुनश्च निवड करण्यात आली.
तर सचिवपदी जितेंद्र ठाकुर व उपाध्यक्षपदी आर. जे.पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार संजय पाटील होते,बैठकीत जेष्ठ पत्रकार किरण पाटील यांनी मार्गदर्शन केले,6 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली व सानेगुरुजी शाळेशेजारी असलेल्या भव्य पटांगणात दि 6 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी संघटनेच्या कार्यकारिणीची फेररचना करण्यासंदर्भात चर्चा झाली असता सर्वानुमते अध्यक्षपदी चेतन राजपूत यांची पुन्हा निवड करण्यात आली तर सचिव पदी जितेंद्र ठाकुर व उपाध्यक्षपदी आर.जे.पाटील यांची निवड झाली.
संघटनेची कार्यकरणी देखील गठीत करण्यात आली, अशी असेल कार्यकरणी..
नूतन पदाधिकारी यांचा सर्वांनी सत्कार केला.यावेळी पांडुरंग पाटील, चंद्रकांत काटे,महेंद्र रामोसे,चंद्रकांत पाटील,बाबूलाल पाटील,महेंद्र पाटील, विक्की जाधव, अमोल पाटील,मुन्ना शेख,डॉ विलास पाटील ,युवराज पाटील,अनिल पाटील,काशिनाथ चौधरी,गणेश पाटील,शामकांत पाटील संभाजी देवरे,वसंतराव पाटील हिरालाल पाटील,आबीद शेख,गजानन पाटील,विजय पाटील,कुंदन खैरनार,सदानंद पाटील,किशोर पाटील,गणेश चव्हाण,अरुण पवार,मनोज चित्ते,स्वप्निल माळी, योगेश पाने उपस्थित होते.