हर्षवर्धन पाटील यांचे निवासस्थानी दिवाळी फराळसाठी सर्वधर्मियांची मांदियाळी !
– इंदापूर येथे भाग्यश्री बंगलो गर्दीने फुलला!
इंदापूर : प्रतिनिधी भगवान लोंढे दि.13/11/23
इंदापूर येथे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे भाग्यश्री बंगलो निवासस्थानी दिपावली सणा निमित्त स्नेहमीलन कार्यक्रमामध्ये दिवाळी फराळनिमित्ताने सर्वधर्मियांची मांदियाळी सोमवारी (दि.13) दिसून आली. रमजान ईद सणाला मुस्लिम बांधव जसे हिंदूं बांधवांना शिरखुर्मा खाण्यासाठी बोलवतात, तसे हर्षवर्धन पाटील यांनी मुस्लिम समाज बांधवांना दिवाळी फराळ साठी निमंत्रित केले होते.
हर्षवर्धन पाटील यांनी सर्व जाती-धर्मातील बांधवांना दिवाळी फराळसाठी आपुलकीने भाग्यश्री बंगलो येथे बोलावले होते. आलेल्या सर्वांशी हर्षवर्धन पाटील यांनी आपुलकीने संवाद साधत विविध विषयांवर गप्पागोष्टी केल्या. ज्येष्ठ नेते शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांचे पासून गेली 71 वर्षांमध्ये इंदापूर तालुक्याने सर्वधर्मसमभावाची परंपरा जोपासली आहे, हीच सर्वधर्मसमभावाची बंधुत्वाची परंपरा आपणही पुढे चालू ठेवली असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रतिवर्षीप्रमाणे हर्षवर्धन पाटील व कुटुंबीयांकडून जनतेसाठी सोमवारी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या निमित्ताने भाग्यश्री बंगलो व परिसर हा स्नेहमीलन कार्यक्रमनिमित्ताने राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, सर्वधर्मीय नागरिकांच्या गर्दीने फुलून गेला होता. यावेळी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सौ.भाग्यश्री पाटील, राजवर्धन पाटील यांनी जनतेच्या शुभेच्छा स्विकारल्या. दरम्यान, भाग्यश्री बंगलो येथे सोमवारी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शुभेच्छा देणेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गर्दीचे चित्र पहावयास मिळाले.