July 1, 2025 4:57 am

ज्यांच्या हाती राज्याची धुरी ,त्यांनाच झाली गाव बंदी

अपनी भाषा में पढ़े! Translate

निषेध आंदोलन
ज्यांच्या हाती राज्याची धुरी ,त्यांनाच झाली गाव बंदी
उपमुख्यमंत्री यांना दौंड शुगर, आलेगाव येथील नियोजित कार्यक्रमासाठी सकल मराठा समाज दौंड यांच्याकडून बंदी…..

प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58

दौंड – मराठा योद्धा मनोज जरांगे सध्या मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषण करीत आहेत, त्यांच्या उपोषणांस पाठिंबासाठी देण्यासाठी दौंड शहर व तालुक्यात विविध पातळीवर साखळी उपोषण, अमरण उपोषण चालू आहे तसेच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी व राजकीय कार्यक्रमावर बहिष्कार अशा प्रकाराचे आंदोलन चालू आहे. म्हणुन आंदोलनाचा एक भाग म्हणून 2 नोव्हेंबर 2023 रोजी दौंड शुगर, आलेगाव, ता. दौंड येथे सुरू होणाऱ्या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी – माननीय नामदार अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत. त्यांना तीव्र विरोध करण्यासाठी दौंड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तरी गुरुवार, दि. 2/11/2023 रोजी सकाळी 11,00 वाजता, दौंड शुगर, आलेगाव ता. दौंड येथे गरजवंत मराठा समाजातील आदोलकांनी बहुसंख्येने जमावे व आपला निषेध नोंदवावा असे आवाहन सकल मराठा समाज दौंड शहर व तालुका यांच्याकडून करण्यात आले आहे. त्यासाठीचे रितसर निवेदन मा. तहसीलदार दौंड, दौंड पोलीस स्टेशन तसेच कार्यकारी संचालक दौंड शुगर यांना देण्यात आले आहे.
यामधे असेही म्हणण्यात आले आहे कि दादा अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत व त्यांच्याकडून समाज फार मोठ्या अपेक्षा बाळगून आहे तरी आपण समाजाच्या भावना समजून कार्यक्रम न करावा अशी विनंती करण्यात आली.
निवेदन देते वेळी विक्रम पवार,राजू कदम,शैलेंद्र पवार,अविनाश गाठे, रोहन घोरपडे,सज्जन काकडे,प्रमोद पवार,वैभव जठार,विठ्ठल दरेकर असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!