दौंडच्या नागरिकांचे बारामती हेलपाटे होणार बंद आप च्या पाठपुराव्यामुळे आर. टी.ओ कॅंप दौंडमध्ये सुरू.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – कोरोना काळापुर्वी महिन्यात दर आठवड्याला एक दिवस दौंड शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी आर. टी.ओ संदर्भातील कामकाज करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती यांचेकडून कॅंप आयोजित केला जात होता.
कोविड नंतर च्या काळात आजपर्यंत सदरचा कॅंप बंद होता त्यामुळे दौंडकरांना आर.टी.ओ च्या संबंधित कामांसाठी बारामती येथे जावे लागत होते व काही वेळा अनेक हेलपाटे पण मारावे लागत होते त्यासाठी आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
या बाबतीत आम आदमी पार्टी दौंड तर्फे शिष्टमंडळाने मा.केसकर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांची भेट घेऊन चर्चा केली व तातडीने सदरचा कॅंप चालू करणे बाबतीत निवेदन देऊन विनंती केली होती.या मागणीला यश आले असून दि. २५ ऑक्टोंबर पासून दौंड मधील एसटी स्टँड (डेपो) जवळील मोकळ्या जागेत कॅम्प करण्यात येणार असल्याचे सांगितले.
आम आदमी पार्टीचे संयोजक रवींद्र जाधव व यांची सर्व टीम पक्षाचे कार्यकर्ते यांचे दौंड शहरातील तसेच दौंड तालुक्यातील नागरिकाकडून आभार मानले जात आहेत.