July 1, 2025 1:53 am

मदनवाडी चौकातील काम समाधान कारक झाले पाहिजे-जेष्ठ पत्रकार दादासो थोरात

अपनी भाषा में पढ़े! Translate

मदनवाडी चौकातील काम समाधान कारक झाले पाहिजे-जेष्ठ पत्रकार दादासो थोरात

(निलेश गायकवाड )

मदनवाडी चौफुला येथील रस्त्याच्या कामामध्ये काही त्रुटी असल्यामुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याने स्थानिकांनी जेष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब थोरात यांना कामा विषयी तक्रार केली होती याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी बोलवून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात असे पी डब्ल्यु डी च्या अधिकारी यांना दादासाहेब थोरात यांनी सांगितले.
बारामती अमरापूर राज्यमार्ग विस्तारीकरणाचे काम चालू असून यामध्ये मदनवाडी चौफुला येथील लोकांना विश्वासात न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरु केले होते.यामध्ये राशिन रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटर लाईन करण्यात आले आहे त्याच्या एका बाजुला पाईपलाईनची गटर लाईन केली आहे तर एका बाजुला काहीच प्रयोजन करण्यात आले नाही याबाबत दोन्ही बाजुला सिमेंट पाईपलाईन करण्याच्या सुचना दिल्या त्याच प्रमाणे सिमेंटच्या चौकोणी मोठ्या गटराची उंची अहिल्यादेवी चौकातील उड्डाण्पुलापेक्षा जास्त होता कामा नये अशाही सुचना दिल्या. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याला योग्य प्रकारे कामाची जाणीव करुन दिली त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम भिगवण उपविभागाचे उपाभियंता मधूकर सुर्वे,शाखा अभियंता श्रीकांत टिळेकर आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी समाधानकारक उत्तरे दिली व काम योग्यप्रकारे करण्याचे आश्वासनही दिले. अधिकारी यांनी नागरीक,व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी माजी जि.प. सदस्य हनुमंत बंडगर,जेष्ठ पत्रकार दादासाहेब थोरात,शरद चितारे,सतिश शिंगाडे,गणेश थोरात,जगदंबा हॉटेलचे मालक दादा थोरात,संदिप ताटे आदी उपस्थित होते.
राशिन रस्त्यावरील दत्तनगर भागात रस्त्याचे पाणी मोकळे सोडण्यात येणार होते त्यासाठी देखील बंदिस्त गटारीचा मार्ग केला जाईल असेही यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य केल्याचे दादासाहेब थोरात यांनी सांगितले. यावेळी नागरिकांच्यावतीने दादासाहेब थोरात यांनी अडीअडचणींवर मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!