June 29, 2025 7:35 pm

शिवसेनेकडून नागरिकांना दसरा, दिवाळी निमीत्त 60 रुपये किलोने डाळ – महेश चिवटे, जिल्हाप्रमुख शिवसेना

अपनी भाषा में पढ़े! Translate

  • करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी व संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दसरा व दिवाळीसाठी राज्यातील प्रत्येक व्यक्तीला साठ रुपये किलो दराने प्रत्येकी पाच किलो डाळ मिळणार असून ही डाळ शिवसेनेच्या सर्व कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे असल्याची माहिती जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे

या दाळ वितरणाचा शुभारंभ शुभारंभ शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे

डाळीच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांना दाळ मिळावी म्हणून नाफेडच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड घेऊन आले की पाच किलो दाळ प्रति किलो साठ रुपये दराने दिली जाणार आहे

डाळ खरेदीसाठी आधार कार्ड सक्तीची असून एका कुटुंबात पाच सदस्य असतील तर त्यांना पाच 25 किलो दाळ खरेदी करता येणार आहे

तीन ते चार दिवसात ही हरभराची डाळ उपलब्ध करण्यात येणार असून शिवसेनेचे वतीने जेऊर केम पारेवाडी जिंती साडे सालसे घोटी या ठिकाणी डाळ उपलब्ध करण्यात येणार आहे

वितरण ची जबाबदारी
प्रसिद्ध व्यापारी विकी मंडलेचा यांच्या कडे
देण्यात आली आहे

@@@

ग्रामीण भागातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मागेल तेथे डाळ विक्री केंद्र सुरू करून देण्यात येणार आहे इच्छुक आणि शिवसेना कार्याची संपर्क साधावा असे आव्हान जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केल आहे

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!