दौंड मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनोखे आंदोलन.
दौंडकर व व्यापारी बांधवाना दिले लघवी चे भांडे……
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – मागील काही महिन्यापासून दौंड शहरात व गजबजलेल्या व्यापार पेठेत दौंड नगरपरिषदे ची मुतारी नाही त्यामुळे व्यापार पेठेत येणार्या ग्राहकांची विशेषता महिलांची कुचंबणा होते तसेच व्यापारी वर्गाला दुकान सोडून कुठेतरी दुर लघुशंकेसाठी जावे लागते.यासाठी यापुर्वी ही अनेक पक्ष, संघटनांनी मोर्चे, आंदोलने केली परंतु नगरपरिषदेने याकडे लक्ष दिले नाही.
आज मनसेने आपल्या स्टाईल ने स्वच्छतागृह (मुतारी) साठी आंदोलन केले
शहरातील मार्केट मध्ये मुतारी नसल्याने सर्व सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागतो यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दौंड शहर अध्यक्ष संदिप बोराडे व तालुका अध्यक्ष सचिन कुलथे तसेच मनसेचे सर्व पदाधिकारी यांचे कडून दौंड नगर परिषदे विरोधात दौंडकर नागरिकांना व व्यापाऱ्यांना लघवी चे भांडे वाटप करण्यात आले.
मनसेच्या या अनोख्या पद्धतीने केलेल्या आंदोलनास शाहनवाज पठाण,शैलेंद्र पवार,नागसेन धेंडे,अमोल जगताप, जाधव,रामेश्वर मंत्री,गणेश दळवी आदींनी या आंदोलनास पाठिंबा दर्शविला.