June 30, 2025 3:58 pm

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी घेतली गोरेगाव येथे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील जखमींची घेतली भेट…

अपनी भाषा में पढ़े! Translate

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी घेतली गोरेगाव येथे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील जखमींची घेतली भेट…
गोरेगाव पश्चिम येथील एस.आर.एच्या इमारतीत लागलेल्या भिषण आगीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा ट्रॉमा केअर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींची व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करण्यासाठी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी रूग्णालयात जाऊन भेट घेतली. रुग्णांवर करण्यात येणार्‍या उपचाराबाबत रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांच्या समवेत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत विधानसभा समन्वयक बावा साळवी, माजी नगरसेवक बाळा नर, रेखा रामवंशी, उपविभागप्रमुख बाळा साटम, जयवंत लाड, कैलाशनाथ पाठक, शाखाप्रमुख अमर मालवणकर, मंदार मोरे, नितीश म्हात्रे, प्रदीप गांधी, प्रियंका आंबोळकर, हर्षदा गावडे, मयुरी रेवाळे, दणदणे, सुचित्रा चव्हाण, शाखा समन्वयक उमेश कदम, रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. सुखदेव, आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!