करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- दि.6/10/2023 रोजी वंचित बहुजन युवा आघाडी करमाळा तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी आढावा बैठक घेतली. तालुका व शहर कमिटीवर इच्छुक असलेल्या कार्यकर्ते यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. गांव तिथे जाऊन कार्यकर्ते जोडून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सर्वाना सोबत घेऊन पक्ष ताकत तयार करावी सभासद नोंदणी करून घ्यावी. गांवात जाऊन अडी अडचणी समजून घ्या साहेबांच्या विचार लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी आहे. असे जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी मत व्यक्त बैठकीत सांगण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय कांबळे यांनी केले. यावेळी शहर अध्यक्ष. गणेश कांबळे. महासचिव. राम कांबळे. कोषाध्यक्ष. समाधान दनाने. सोनु मोरे. पप्पू उबाळे, महावीर शिंदे, कुमार मोरे, चिकू आल्हाट, शंकर शिंदे, लक्ष्मण वाघमोडे, किरण खरात, विकास उबाळे, तुषार लांडगे, गाडे, तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.