खासदार सुप्रिया सुळे यांच्या होणाऱ्या भिगवण येथे उद्याच्या कामगार कार्यकर्ता मेळाव्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष
(निलेश गायकवाड )
देशातील वेगवान राजकिय घडामोडीमुळे लवकरच लोकसभा निवडणुका लागणार असल्याचे दिसत आहे खासदार सुप्रिया सुळे एका महिन्यात सलग तिन वेळा बारामती लोकसभा मतदार संघात दौरा करत असुन उद्या शनिवारी ७ तारखेला भिगवण मधील व्यंकटेश कार्यालयात दुपारी दिड वाजता कंत्राटी कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत यामुळे इंदापुर तालुक्यातील शरद पवार यांच्या विचाराचे कार्यकर्ते सक्रिय होताना दिसत आहेत.
जेष्ठ पत्रकार दादासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सागर मिसाळ हे सल्लागार असलेल्या महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघटनेच्या कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे येत असल्याने बिल्ट कंपनीतील कंत्राटी कामगारांच्यात देखील उत्साह असल्याचे दिसते.
राज्यातील तोडफोडीच्या राजकारणाला जशास तसे उत्तर देण्यासाठी सत्तेच्या बाहेरील गट अतिशय वेगवान झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे एका महिन्यात तब्बल तिन वेळा खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघाचा दौरा केला राज्यासह देशातील इंडियाच्या बैठकांना हजेरी लावत देशभर कार्यकर्त्यांना संपर्क करण्याची जबाबदारी शरद पवार यांच्या गटाच्या वतीने सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर असल्याने प्रमुख चेहरा म्हणुन त्या पायाला भिंगरी लाऊन पळत असल्याचे दिसते.
राज्यातील राजकिय घडामोडी मुळे राजकिय व्यक्ती देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फुट पडल्या नंतर सत्तेच्या बाहेर राहिलेले गट वेगवान झाल्याचे पहायला मिळत आहे.
यावेळी कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रविण भैय्या माने हे प्रमुख उपस्थित राहणार आहे तर शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिलेले महारुद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक घोगरे, मा.जि.प.सदस्य प्रताप पाटील, किसन जावळे, लोणी देवकरचे सरपंच,कालिदास देवकर, मा.जि.प.सदस्य, हनुमंत बंडगर, धनाजी थोरात भिगवणच्या मा. सरपंच हेमाताई माडगे, अश्विनीताई शेंडगे आदी उपस्थित राहणार आहेत.