पत्रकारांचा अपमान करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेची अमळनेरात निघणार प्रतिकात्मक अंत्ययात्रा…पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
उद्या 2 ऑक्टोबर रोजी निघणार अंत्ययात्रा
सत्तेचा माज करत पत्रकारांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्या 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता प्रतिकात्मक अंत्ययात्रा निघणार असून जिल्ह्यातील अनेक पत्रकार यात सहभागी होणार आहेत. अमळनेर शहरातील तिरंगा चौक येथून ही अंत्ययात्रा तहसीलदार कार्यालयासमोर येणार आहे. याठिकाणी गांधी मार्गाने प्रतिकात्मक शवावर फुलं वाहण्यात येणार आहेत. या आंदोलनात अमळनेर तालुक्यातील व जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, अमळनेर यांनी केले आहे.