July 1, 2025 9:56 am

हर्षवर्धन पाटील यांनी साधला कार्यकर्त्यांशी गावनिहाय संवाद!

अपनी भाषा में पढ़े! Translate

हर्षवर्धन पाटील यांनी साधला कार्यकर्त्यांशी गावनिहाय संवाद!
– रत्नाई बंगला गर्दीने फुलला – कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद
इंदापूर : प्रतिनिधी भगवान लोंढे दि.29/9/23
भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे रत्नाई निवासस्थानी बुधवारी (दि. 27) बावडा भागातील व भीमा-नीरा नदीकाठच्या अनेक गावांमधील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संवाद बैठकांमुळे रत्नाई निवासस्थान हे कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. या संवाद बैठकांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
या बैठकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना काही सूचना केल्या तसेच अडचणी जाणून घेतल्या. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी बावडा, गणेशवाडी, ओझरे, गोंदी, पिंपरी बु. टणू, नरसिंहपुर, गिरवी, सराटी, लुमेवाडी, लिंबोडी, कचरवाडी(बा.)भगतवाडी, निरनिमगाव, पिठेवाडी, चाकाटी, बोराटवाडी, लाखेवाडी, रेडा, रेडणी, जाधववाडी, सराफवाडी, काटी, पिटकेश्वर, घोरपडवाडी, हगारवाडी, शिरसटवाडी, निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, खोरोची, भोडणी, वकीलवस्ती, सुरवड, शेटफळ हवेली, भांडगाव, अवसरी, पंधारवाडी या गावातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संवाद बैठकांमुळे भाजप कार्यकर्त्यामध्ये उत्साह दिसून आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!