July 1, 2025 12:47 pm

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील गरजू महिलांना निर्धुर चुल वाटप कार्यक्रमाचे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील गरजू महिलांना निर्धुर चुल वाटप कार्यक्रमाचे आयोजन

तब्बल २ हजार लाभार्थी महिलांना निर्धुर चुलीचा होणार फायदा

प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघासह परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अशातच ‘शाश्वत जगाची निर्मिती’ या प्रकल्पांतर्गत कर्जत व जामखेड तालुक्यातील गरजू महिलांना निर्धुर चूल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत कर्जत व जामखेड मधील दोन हजाराहून अधिक ग्रामीण भागातील गरजू महिलांना निर्धूर चुलीचे वाटप करण्यात आले.

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयआय केअर फाउंडेशन व कॅपजेमिनी यांच्या मदतीने आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून ‘शाश्वत जगाची निर्मिती’ या प्रकल्पाअंतर्गत गरजू महिलांना दोन्ही तालुक्यात स्वतंत्रपणे कार्यक्रम ठेवून निर्धूर चुलीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार, सौ.सुनंदाताई पवार यांच्यासह प्रमुख उपस्थिती म्हणून आय.आय केअर फाउंडेशनचे संचालक डॉ. संतोष भोसले तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ.सविताताई व्होरा यांची देखील उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील तीन दगडाची चूल व मातीची चूल या चुलीमुळे आरोग्यावर घातक परिणाम होत असतो. त्यानुसार फुफुसांचे आजार, श्वसनाचे आजार, डोळ्याचे आजार देखील यामधून होण्याचा मोठा धोका संभवतो. परंतु निर्धूर चुलीमुळे 60 ते 70 टक्के धूर कमी होत असल्याने महिलांच्या आरोग्यावर होणारा घातक परिणाम देखील कमी होण्यास मदत होईल, यासोबतच निर्धूर चुलीला लागणारे सरपन हे बाकीच्या चुलीच्या प्रमाणापेक्षा 50% कमी लागते आणि सरपण कमी लागत असल्यामुळे वृक्षतोडही कमी होईल आणि यामुळे पर्यावरणावर त्याचा विघातक परिणाम होणार नाही. ग्रामीण भागातील गरीब महिलांना या निर्धूर चुलीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!