मदनवाडी ग्रामपंचायत च्या वतीने मोफत बियाणे वाटप व दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर वाटप
(निलेश गायकवाड)
महाराष्ट्र शासन कृषी विभाग तर्फे मदनवाडी गावातील शेतकऱ्यांसाठी फुले सुचित्रा या ज्वारी वाणाचे बियाणे मोफत वाटप करण्यात आले तसेच ग्रामपंचायत मदनवाडी अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर वाटप करण्यात आले .
तसेच वृद्ध व्यक्तींना स्टिक वाटप करण्यात आले .कार्यक्रमास माननीय नानासाहेब बंडगर व सौ अश्विनी मारुती बंडगर सरपंच तसेच उपसरपंच गोरख बंडगर ग्रामपंचायत सदस्य मारुती बंडगर, अण्णा ढवळे तेजस देवकाते,कुंडलिक बंडगर ज्ञानदेव बंडगर,संगीता कुदळे,शहाजी बंडगर,प्रीती देवकाते,अतुल देवकाते करिष्मा सवाने व मदनवाडीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.