राजवर्धन पाटील यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद असोसिएशनच्या श्रीगणेशाची आरती
(निलेश गायकवाड )
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख युवा नेते राजवर्धन पाटील यांच्या हस्ते आज रविवारी ( दि. 24 सप्टेंबर ) रोजी मदनवाडी येथील मंडळातील श्रीगणेशाची आज आरती करण्यात आली.भक्तीमय वातावरणात उपस्थित नागरिकांनी यावेळी आरतीमध्ये सहभागी होऊन गणरायाचे पूजन केले.
भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण सर्वजण श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून प्रार्थना करतो.आपल्या संस्कृती आणि परंपरेत श्रीगणेशाची प्रतिष्ठापनेला विशेष महत्त्व आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सामाजिक बांधिलकी जोपासून आपली ही संस्कृती वृद्धिंगत करीत असतात असे मत राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद असोसिएशन मदनवाडीच्या श्रीगणेशाची आरती राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी संचालक मुन्ना देवकाते, अरविंद देवकाते, जाफर मुलाणी, आकाश वनवे, अक्षय बंडगर तसेच युवा उद्योजक जगदंबा हॉटेल चे मालक गणेश थोरात,यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वाघमोडे यांनी आभार मानले व गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यामध्ये सहभागी झाले होते.