श्रीमती ललिता घ्यार (सौ.ललिता दिनेश पालवे) यांना शिवसेने तर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार घोषित..
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार सन्मान..
अमळनेर: विक्की जाधव..
श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेच्या शिक्षिका श्रीमती ललिता घ्यार (सौ.ललिता दिनेश पालवे)
जळगांव जिल्हा शिवसेना पक्षा तर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार निवडपत्र शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस सागर हिवराळे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
श्रीमती ललिता घ्यार गेल्या ११ वर्षापासून शाळेत
गणित विषय शिकवितात.
विद्यार्थ्यांनमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करतात. तसेच करुणा इंटरनॅशनल चेन्नई करुणा क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करुणा, शाकाहार,पर्यावरण रक्षण ,जीव दया यावर मार्गदर्शन करतात. त्यांचे पती दिनेश पालवे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस.एस. सूर्यवंशी यांचे नेहमीच त्यांना मार्गदर्शन मिळते.