July 1, 2025 4:48 am

देशी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणारे २ आरोपी सोनई येथून ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

अपनी भाषा में पढ़े! Translate

देशी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणारे २ आरोपी सोनई येथून ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

प्रतिनिधी.संदिप कायगुडे
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि / श्री. दिनेश आहेर, स्थागुशा अहमदनगर यांना आगामी सण उत्सव अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.

नमुद आदेशान्वये पोनि / श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ / दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, शदर बुधवंत, पोना / रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, पोकों/ राहुल सोळंके व चापोहेकॉ / अर्जुन बडे अशांना जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारा बाबत माहिती घेताना पोनि / श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे विशाल महाडीक रा. राहुरी हा साथीदारासह गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगुन त्याची विक्री करण्यासाठी काळे रंगाचे मोटार सायकलवर घोडेगांव ते अहमदनगर रोडवरील मातोश्री लॉजिंग परिसरात येणार आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोनि / श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळविली व पंचाना सोबत घेवुन, खात्री करून कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले.

पथकाने लागलीच नगर घोडेगांव रोडने मातोश्री लॉजिंग परिसरात जावुन सापळा लावुन थांबलेले असताना. थोडाच वेळात काळे रंगाचे पल्सर मोटार सायकलवर दोन संशयीत इसम लॉज जवळ येवून थांबले. पथकास त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने दोघांना शिताफिने ताब्यात घेतले. ताब्यातील संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १) विशाल संजीत महाडीक वय ३२, रा. मानोरी, ता. राहुरी व २) सागर साहेबराव खांदे वय २३, रा. येवला आखाडा, ता. राहुरी असे असल्याचे सांगितले. त्याची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुस मिळुन आले. त्याबाबत त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी गावठी कट्टा व जिवंत काडतुस विक्री करण्याचे उद्देशाने आणल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना ३०,०००/- रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा, १,०००/- रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुस व ५०,०००/- रुपये किंमतीची काळे रंगाची हिरो होंडा कंपनीची एक स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण ८१,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोना / १८५ ज्ञानेश्वर नामदेव शिंदे ने स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी सोनई येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. ४३७ / २०२३ आर्म अॅक्ट

३/२५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही सोनई पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपी नामे सागर साहेबराव खांदे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द ओतुर, पोलीस स्टेशन जिल्हा पुणे गु.र.नं. ४१४ / २०२२ भादविक ३९४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर, मा. श्री. सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!