अंतरवली लाठी चार्जचा भिगवण मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे जाहीर निषेध
प्रतिनिधी:- शेटफळगडे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवली ता. अंबड जि. जालना येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याच्या निषेधार्थ भिगवण येथे शुक्रवारी रात्री निषेध केले.जालना अंतरावली सराटी इथं हा प्रकार घडला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इथं आंदोलन सुरू होते, आंदोलकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. या आंदोलनावेळी पोलिसांनी हा लाठीचार्ज केला. यात काही आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले आहेत. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्जमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे.
या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटण्यास सुरवात झाली असून पुणे जिल्ह्यातील भिगवणमध्ये ‘अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे’ जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे. भिगवण शाखेच्या वतीने हा निषेध नोंदवण्यात आला असून “आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे” जाहीर निषेध! जाहीर निषेध ! आंदोलन दडपणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध अशी घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली आहे.