June 30, 2025 3:03 am

महावितरण कडून महत्त्वाची सूचना उद्या काही भागात विज पुरवठा बंद राहणार आहे.

अपनी भाषा में पढ़े! Translate

महावितरण कडून महत्त्वाची सूचना उद्या काही भागात विज पुरवठा बंद राहणार आहे.

दौंड तालुक्यातील अनेक भागात महा वितरण वेळी अवेळी लोडशेडींग मुळे नागरिक हैराण !

प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158

दौंड – गेल्या एक ते दीड महिन्यापासून दौंड तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे अद्याप पर्यंत पावसाचे कोणतेही चिन्ह दिसत नाही शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत जेथे थोडे फार पाणी शिल्लक आहे तेथे पिक वाचवण्यासाठी जिवाची बाजी लावली जात आहे.
महावितरण कंपनी कडून वेळी अवेळी विज बंद करून शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहेत. दिवसभरात फक्त 4 ते 5 तास वीज मिळते त्यातही एक्स्ट्रा लोड शेडिंग शेतकऱ्यांवर लादले जात आहे. शेतकऱ्याने जगावे की मरावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता फक्त शेतकऱ्यांची शेतीची विज बंद करावी असा वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले आहे कोणतीही पूर्व सूचना न दिल्याशिवाय विज पुरवठा बंद केला जातो.
अशा अनेक तक्रारी आखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड कार्यालयात आल्या असून भविष्यात जर शेतकरी सुखी राहीला तर देश सुखी राहील
शेतकऱ्यांनी जगावे की मरावे अशी परिस्थिती आहे येणाऱ्या निवडणुकीत याचा फटका सरकारला बसेल तेव्हा आपणास विनंती करण्यात येते की सध्या दौंड तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली असून रात्री शेतीला पाणी देणे धोकादायक असते तरी विज दिवसा मिळावी व लवकरात लवकर शेतकऱ्याना न्याय देण्यात यावा अशी मागणी ई मेल द्वारे महावितरण कार्यालयास 1 ऑगस्ट 2023 रोजी गणेश जगताप अध्यक्ष आखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड यांनी केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!