राज्यात आतापर्यंत एकूण १६ ठिकाणी नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू
राज्यात आतापर्यंत एकूण १६ ठिकाणी नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरु करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना दिली आहे. नाशिक जिल्ह्यात नाफेड कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत आज मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, विंचूर, अंदरसूल, मुंगसे, ताराबाद, नामपूर, मालेगाव, मनमाड, देवळा या ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आला आहेत. उद्या येवल्यात नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरु केलं जाणार आहे. त्यानुसार राज्यात आता एकूण १६ ठिकाणी नाफेडच्या वतीने कांदा खरेदी केंद्र सुरु असणार आहे, असंही भुजबळ यांनी सांगितलं.