माळेगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवार 26 ऑगस्ट रोजी होणार…
.
बारामती ( सह -संपादक – संदिप आढाव)
माळेगाव पोलिस ठाण्याच्या नविन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी दि.२६ रोजी करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
बारामती तालुक्यातील माळेगाव येथे नवीन पोलिस ठाण्याची स्थापना करण्यात आली आहे.या ठाण्याच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे.या इमारतीचे उद्घाटन शनिवारी दि.२६ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
या उद्धाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून या तयारीची पाहणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी केली असून विविध सुचना त्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान उद्धाटनाची जय्यत तयारी करण्यात आली असून त्यात कोणत्याही स्वरुपाची कमतरता जाणवणार नाही अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.