July 1, 2025 2:09 am

आयुक्त साहेब, आपल्या वांझोट्या वृत्तीचा जाहिर निषेध !

अपनी भाषा में पढ़े! Translate

आयुक्त साहेब,
आपल्या वांझोट्या वृत्तीचा जाहिर निषेध !

प्रियंका राजपुत प्रकरणीआपण जे नरमाईचे धोरण अवलंबिले आहे, ती आपली मजबुरी असेलही ! परंतू उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक या नात्याने आपलेच ते उत्तरदायित्व आहे. आपण या प्रकरणी जी निष्क्रियता व अनास्था दाखवत आहात, त्यामुळे आपणच अडचणीत येणार आहात.

मतदार जागृतीच्या कामात प्रियंका राजपुत या १०० टक्के दोषी ठरल्या आहेत. वालधुनी नदीच्या किनारी शासकिय भूखंडावरील अतिक्रमणास मालमत्ता कर पावती देणे व नंतर ती महापालिकेच्या वेबसाईट वरून डिलिट करणे, रमेश चव्हाण सारख्या राजकारणी लोकांच्या मालमत्तेचे under assessment करून त्यांना आर्थिक लाभ मिळवुन देणे व त्याबाबत मोबदला घेणे, कोणार्क रेसिडेन्सीच्या ७०१ नंबरच्या फ्लॅट मधे २ वर्षे मोफत राहणे, त्याबदल्यात १६ प्लॅटला मालमत्ता कर न लावणे, स्वत:भाड्याने (?) राहत असलेल्या फ्लॅटला रेंटल व्यॅल्यूने मालमत्ता कर न लावणे, अधिका-यांशी व कर्मचा-यांशी उद्धट बोलणे, लोकप्रतिनिधी व विरोधकास “कुत्ते भोकते हजार बोलणे”, बारमध्ये (सार्वजनिक ठिकाणी) एका अधिका-या सोबत खुलेआम मद्यपान करणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे, मिटींगला हजर न राहणे इत्यादी इत्यादी इत्यादी …..

इतका भ्रष्टाचार व बेशिस्तपणा,इतकी आर्थिक अनियमितता करणा-या महिला अधिका-याबाबत आपण कारवाई करण्याची मर्दुमकी दाखवु शकत नसाल तर त्या मॅडमना आपल्या आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार देऊन सेवानिवृत्तीपुर्वी दीर्घ रजेवर जावे.

दोन शासकिय यंत्रणांनी दोषारोप करून १० महिने झाले तरी आपण चौकशीचे नाटक करून तिच्या पदराआड लपणार असाल तर एक आयुक्त म्हणून मला आपली लाज वाटते व मी समस्त उल्हासनगरकरांच्या वतीने आपल्या या वांझोट्या वृतीचा जाहिर निषेध करीत आहे.

दिलीप मालवणकर
उल्हासनगरचा भूमीपुत्र
९८२२९०२४७०

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!