कुकडी आवर्तन ची आवश्यकता आणि गरज
माजी मंत्री आ.प्रा .राम शिंदे यांनी ओव्हरप्लोचे आवर्तन सोडण्याचा घेतला महत्वपूर्ण निर्णय
प्रतिनीधी.संदिप कायगुडे
कर्जत:महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब व उच्च तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार आज दिनांक 28/7/2023 रोजी संध्याकाळी कुकडी आवर्तन सोडण्याचे आदेश प्रा. राम शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अभियंता यांना दिले. शिरुर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या ठिकाणी पाऊस कमी पडल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. यामुळे कुकडी डावा कालवा ओव्हर फ्लो आवर्तन सोडण्याची मागणी प्रा राम शिंदे यांच्याकडून करत लगेच आवर्तन सोडण्यासाठी कार्यवाहीसह आवर्तन सोडण्याच्या निर्णय झाला. या वेळी कुकडी कालवा सल्लागार समितीचे अशासकीय सदस्य काकासाहेब धांडे हे उपस्थित होते.
कुकडी खरिप आवर्तनाच्या अनुषंगाने कुकडी डावा कालवा व इतर कालवे सुरु करुन लाभक्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी पाणी देणे तसेच सिना, विसापूर व इतर मागणी येणारे तलाव भरुन देणे प्रस्तावित करणेत आले आहे. कुकडी प्रकल्पातील कालवे आवश्यकतेनुसार ओव्हरफ्लोच्या कालावधी व विसर्गाच्या मर्यादित भरण्याचे प्रस्तावित करणेत आले आहे.
कुकडी धरण श्रृंखंलेमध्ये ४६.७२ टक्के पाणी साठा झालेला आहे. यामध्ये वडज धरणाचा अप्पर गाईड कर्व्ह तसेच येडगाव धरणाच्या अप्पर गाईड कर्व्ह पर्यंत पाणी पातळी पोहचली आहे. चिल्हेवाडी व वडज धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग चालू आहे. व तो विसर्ग येडगाव धरणामध्ये येत आहे. डिंभे, माणिकडोह व पिंपळगाव जोगे धरणामध्ये अनुक्रमे ७५ टक्के, ५८ टक्के व ०९ टक्के एवढा साठा झालेला आहे. येडगाव धरण हे कुकड़ी श्रृंखलेमधील शेवटचे धरण आहे. तसेच या धरणाने अप्पर गाईड कर्व्ह गाठलेला असल्यामुळे त्या धरणाच्या सांडव्यावरून नदीमधे पाणी सोडणे अपेक्षीत आहे. सांडव्यावरून पाणी सोडत असताना कालव्याद्वारे पाणी सोडल्यास त्यातून विद्युत निर्मिती होऊ शकते. त्यामुळे सहाजीकच कालव्याद्वारेही पाणी सोडणे अपेक्षीत आहे. या विषयाचे अनुशंगाने आज दि. २८/०७/२०२३ रोजी मंडळांतर्गत कार्यकारी अभियंतांची बैठक घेतली असता, “सध्या कुकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये पाऊस काही भागामध्ये झालेला आहे व अजुनही पाऊस चालू आहे. लाभक्षेत्रामध्ये सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता आहे. तसेच सिना, विसापूर सारखे धरण किंवा इतर छोटे लघु पाटबंधारे तलाव ज्यांनी अजून १०० टक्के पर्यंत पाणी पातळी गाठलेली नाही अशा धरणांमध्येही या डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडता येऊ शकते असे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले आहे.
विसापूर धरणामध्ये मागील वर्षी पूराच्या काळामध्ये कुकडी डाव्या कालव्यामधून पाणी सोडल्यामुळे त्याचा नंतरच्या आवर्तनामध्ये फीडींग म्हणून पूरक उपयोग झालेला आहे. वरील सर्व पाणी पातळी, जलाशयातील पाणीसाठा व कुकडी डावा कालव्यातुन पाणी सोडणेबाबत मुख्य अभियंता यांचेशी चर्चा केलेली आहे व त्यांनी यास सहमती दर्शवलेली आहे. लाभक्षेत्रातील पर्जन्यमान कमी असलेल्या शिरुर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याने कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून प्रा. राम शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .