मुंबईतील अंधेरी एम.आय.डी.सी.मधील कामगार रूग्णालय ऑगस्टअखेर सुरु करणार – आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
मुंबई, दि. २७ : मुंबईतील अंधेरी पूर्व एम.आय.डी.सी.मधील कामगार रूग्णालय ऑगस्टअखेर सुरु करणार असल्याचे उत्तर आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात विधानपरिषदेत दिले.
मुंबईतील अंधेरी (पूर्व) एम.आय.डी.सी.मधील कामगार रूग्णालय बंद असल्याबाबतचा प्रश्न विधानपरिषद सदस्य डॉ.मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत बोलत होते.
प्रा.डॉ.तानाजी सावंत म्हणाले की, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मुंबईतील अंधेरी (पूर्व) एम.आय.डी.सी.मधील कामगार रूग्णालय ऑगस्टअखेर सुरु करणार आहोत.मुंबईतील अंधेरी एम.आय.डी.सी.मधील कामगार रूग्णालय ऑगस्टअखेर सुरु करणार – आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत
मुंबई, दि. २७ : मुंबईतील अंधेरी पूर्व एम.आय.डी.सी.मधील कामगार रूग्णालय ऑगस्टअखेर सुरु करणार असल्याचे उत्तर आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात विधानपरिषदेत दिले.
मुंबईतील अंधेरी (पूर्व) एम.आय.डी.सी.मधील कामगार रूग्णालय बंद असल्याबाबतचा प्रश्न विधानपरिषद सदस्य डॉ.मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत बोलत होते.
प्रा.डॉ.तानाजी सावंत म्हणाले की, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मुंबईतील अंधेरी (पूर्व) एम.आय.डी.सी.मधील कामगार रूग्णालय ऑगस्टअखेर सुरु करणार आहोत.