July 1, 2025 10:52 am

श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेत 79 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..!

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेत 79 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.. !

अमळनेर : विक्की जाधव..

खा.शि मंडळाच्या श्रीमती द्रौ.रा कन्या शाळेमध्ये 23 जुलै रोजी 79 वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.अनिल शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अविनाश जोशी उपस्थित होते. सुरुवातीला द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर शाळेचा लोगो असलेला आकाश कंदील आकाशात सोडण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक सादर केले. आलेल्या सर्व मान्यवरांचा परिचय जेष्ठ शिक्षिका एस.पी. बाविस्कर यांनी केला. सुरुवातीला खा.शि.मंडळाचे माजी अध्यक्ष विवेकानंद भांडारकर ,हेमंत भांडारकर, विनोद भांडारकर ,अभिजित भांडारकर यांचा चेअरमन प्रदीप अग्रवाल यांनी सत्कार केला. कार्यक्रमास खा.शि मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, संचालक हरीअण्णा वाणी,  प्रा.डॉ.ए.बी.जैन, सहचिटणीस प्रा.डॉ.धिरज वैष्णव, प्रा.आर.एम. पारधी, कैलास पाटील, प्रा.रवींद्र माळी,बी.एस. पाटील,शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रियंका पवार उपस्थित होते. वर्षभरामध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. वर्षभरात विविध क्षेत्रात पुरस्कार प्राप्त शाळेतील शिक्षक जे.व्ही.बाविस्कर,डि.एन.पालवे, शिक्षिका वाय.एम.पाटील,एल व्ही घ्यार, पी.पी.वड्याळकर,बी एस.पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी जे.एस.भालेराव यांचा सत्कार करण्यात आला. फुलवात या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्याचे संचालन शिक्षिका पी.पी.जोशी यांनी केले.शाळेत एसएससी मध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी ऋतुजा पाटील हिने आपल्या मनोगतात आपल्या शिक्षकांकडून काय शिकले व  शासकीय चित्रकला परीक्षेत विद्यार्थिनींनी सहभागी व्हावे असे सांगितले.डॉ.अविनाश जोशी यांनी आपल्या भाषणात शालेय जीवनातील आठवणी सांगून विद्यार्थ्यांनिंनी आपली निरीक्षण शक्ति वाढवावी यावर मार्गदर्शन केले. डॉ.अनिल शिंदे यांनी पुढील काळात कलेक्टर होणाऱ्या विद्यार्थीनीला एक लाख रुपयाचे बक्षीस मिळेल अशी घोषणा केली. कला व क्रीडा विभागाने शालेय परिसरात सजावट केली होती. सुत्रसंचालन आर.एस.सोनवणे तर आभार पर्यवेक्षक व्ही.एम.कदम यांनी मानले. वर्धापनदिन कार्यक्रम यशस्वीततेसाठी शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!