भिगवण दफनभूमी संरक्षण भिंतीच्या कामासाठी दत्तात्रय भरणे यांनी 10 लाख रु. निधी केला मंजूर
(निलेश गायकवाड )
भिगवण येथे इंदापूर तालुक्याचे आमदार मा. दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून अल्पसंख्याक विभागाच्या अंतर्गत मंजूर केलेल्या भिगवण दफनभूमी संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.
या कामासाठी आदरणीय भरणे यांच्या माध्यमातून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या वेळी राष्ट्रवादी कॅांग्रेसचे पुणे जिल्हा कोषाध्यक्ष सचिन बोगावत, अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष रियाज शेख, इंदापूर अल्पसंख्यक अध्यक्ष इक्बाल शेख, धनाजीदादा थोरात, आण्णा धवडे, मनोज राक्षे, मोहन शेंडगे, राजेंद्र भिशे, रमेश बाबा धवडे, रोहीत शेलार, सुरेश बिबे, मनोहरबापु हगारे, तैय्यब भाई शेख, शहाजान तांबोळी, रियाज बागवाण, लतीफ तांबोळी, अस्लम मुलाणी, जुबेर शेख, नौशादभाई मुलाणी, ऊमरभाई बागवाण, हाफीज असदआली शेख, मुक्तार भाई मणियार, आदी उपस्थीत होते.