July 1, 2025 1:20 pm

अमळनेरात अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी दिनी अभिवादन

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरात अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी दिनी अभिवादन

अमळनेर–संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आग्रगण्य नेते, लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या ५४ व्या पुण्यतिथी निमित्त दि १८ रोजी मंगळवारी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजबांधव, कलाकार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पूजा करून माल्ल्यार्पण करण्यात आले. तर हरिश्चंद्र कढरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तर सामाजिक कार्यकर्ते सुरेश कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, बाजार समिती सभापती अशोक पाटील, अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील, पत्रकार संजय पाटील, प्रा. रवी बाळसकर, पत्रकार विजय गाढे, पत्रकार मुन्ना शेख, समाधान मैराळे, हितेंद्र बडगुजर, नूर खान, प्रवीण शिरसाठ, अनिल गरुड, डॉ. राजीव कांबळे, सोमा चंदनशिव, विशाल गांगुर्डे, भय्या गरुड, बाळा अवचिते, सचिन गरुड जितु गरुड आदी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!