करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा मधील किल्ला विभाग येथील रहिवासी व सध्या पुणे येथे स्थायिक असलेले श्री संजय पांडुरंग जोशी यांची पिंपरी चिंचवड शहराच्या ब्राम्हण महासंघाच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. ब्राम्हण महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री आनंद दवे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. श्री संजय जोशी हे करमाळा येथील पत्रकार अविनाश जोशी यांचे बंधू असुन संजय जोशी हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांनी करमाळा येथे ही लोकमान्य टिळक तरुण मंडळाच्या माध्यमातून अनेक समाजिक उपक्रम राबविले आहेत. तसेच ज्या व्यक्ती सामाजिक कार्य करण्यास अग्रेसर असतात त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची भावना ते जोपासत असतात. त्यांच्या निवडीने करमाळा येथून त्यांना अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.