मुंबई येथे ना. देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री) यांची आरक्षण तथा समाजाच्या विकासात्मक मागणीकरिता मा. डी.डी. सोनटक्के यांनी घेतली भेट
मुंबई -एका बाजूने विचार केला तर स्वतःला सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक प्रतिष्ठा, राजकीय प्रतिष्ठा प्राप्त असताना तर दुसऱ्या बाजूने विचार केला स्वतःला आरक्षणाची तिळमात्र गरज नसताना स्वतः दरवर्षी लाखो रुपये खर्च करत नागपूर ते मुंबई तसेच नागपूर ते दिल्ली विमान प्रवास करत आरक्षण करिता सरकार दरबारी पाठपुरावा करण्यासाठी पर्यंत करणारे, उद्धेश केवळ आणि केवळ काय तर मी हयात असे पर्यंत या समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे मग माझ्या वेळ व पैसा कितीही खर्च झाला तरी काहीच हरकत नाही यासाठी रक्ताचे पाणी करत आरक्षणाचे काम जिद्दीने तसेच आरक्षणकरिता सतत प्रयत्न करणारे मा. डी. डी. सोनटक्के साहेब यांनी आज दि. १२/०७/२०२३ रोजी ना. देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन) यांची मुंबई येथे भेट घेत….
🔸केंद्र शासनाकडून राज्य शासनाला आलेले पत्र लवकरात लवकर राज्य शासनाने केंद्र सरकारला पाठविणे याबाबत चर्चा केली असता ते मी लगेच पाठवायला सांगतो सोनटक्के साहेब असे ना. देवेद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले तसेच…
🔹काळानुरूप धोबी समाजाच्या गरजा लक्षात घेऊन धोबी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक बाजूच्या सर्वांगीण विकासाकरिता आता संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून राज्यातील धोबी समाजाचा विचार आपण करावा याकरिता लेखी निवेदन देण्यात आले तसेच…
🔸मुंबई येथील विधान भवनात संत गाडगेबाबा यांचे तैलचित्र लावणे याबाबत सुद्धा नियोजनात्मक चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे…
🔹मंत्रालयाचा मुख्य प्रवेशद्वारावर असलेले संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री संदेशाचे फलक ब्राँझ अक्षरात लावण्याबाबत मागणी करून सकारात्मक चर्चा व मागण्या करण्यात आल्यात या प्रसंगी….
महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज महासंघ
(सर्वभाषिक)
मा. डी.डी. सोनटक्के साहेब यांच्या सह विनोद भाऊ दळवी प्रामुख्याने उपस्थित होते.