June 30, 2025 3:51 pm

बेशिस्त वाहनधारकांमुळे भिगवण पेठ सर्व्हिस रस्ताच बनतोय पार्किंगतळ;भिगवण पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळीच आवर घालणे योग्य

अपनी भाषा में पढ़े! Translate

बेशिस्त वाहनधारकांमुळे भिगवण पेठ सर्व्हिस रस्ताच बनतोय पार्किंगतळ;भिगवण पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळीच आवर घालणे योग्य

(निलेश गायकवाड )

भिगवण परिसरात अरुंद रस्ते, वाहन पार्किंगचा अभाव,सर्व्हिस रस्त्याच्यावर फूटपाथवर फेरीवाले, विक्रेत्यांचे अतिक्रमण,वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे बेशिस्त वाहनचालक,चालकांचे कुठेही असणारे थांबे यामुळे भिगवण मेन पेठेत वाहतुकीचा खेळखंडोबा नित्याचाच झाला आहे.

आषाढी एकादश व बकरी ईद सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेत खरेदीदारांची झुंबड पहायला मिळत आहे.परंतु, पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने उभी करताना होणारी कसरत वाहतूक कोंडी सर्वसामान्यांची डोकेदुखी ठरत आहे.खरेदीसाठी बाहेर पडलेल्या भिगवणकरांच्या गर्दीने व आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारीला जाणारे वारकऱ्यांमुळे बाजारपेठेतील रस्ते ओसंडून वाहत आहेत.

मात्र, रस्त्यावर बेशिस्तपणे लावलेली वाहने, पार्किंगचा अभाव व अतिक्रमणांमुळे बाजारपेठेबरोबरच ग्राहकांचाही श्वास गुदमरतो आहे. बाजारपेठेत पायी चालणेही अवघड झाले आहे. वाहतूक शिस्तीचा मागमूसही या भागात नाही. किमान सणासुदीत खरेदी सुखावह करणारे नियोजन करण्याची आवश्यकता व्यापारी व ग्राहकांनी व वारकऱ्यांनी व नागरिकांनी व्यक्त केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!