June 29, 2025 12:43 pm

गावात एकोपा व सहकार्य करण्यासाठी गाव पुढाऱ्यांना दिला दत्तात्रय भरणे यांनी कानमंत्र

अपनी भाषा में पढ़े! Translate

गावात एकोपा व सहकार्य करण्यासाठी गाव पुढाऱ्यांना दिला दत्तात्रय भरणे यांनी कानमंत्र

( पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न)

(निलेश गायकवाड )

मदनवाडी :पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे भव्य दिव्य अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. माझी राज्यमंत्री विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

मदनवाडी गावातील अनावरण व लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवर यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी सभापती प्रवीण माने, डॉ. शशिकांत तरंगे, श्रीमंत ढोले, घनश्याम हाके, जिल्हा परिषदेचे सदस्य हनुमंत बंडगर,मदनवाडी गावाचे सरपंच अश्विनी नानासाहेब बंडगर,रंगनाथ देवकाते, नवनाथ पडळकर, कायदेतज्ञ महेश देवकाते,तुकाराम बंडगर, प्रकाश ढवळे, जेष्ठ पत्रकार दादासो थोरात सचिन बोगावत,धनाजी थोरात,अजिंक्य माडगे,कायदेतज्ञ् पांडुरंग जगताप, डॉ. तुळशीराम खारतोडे,हर्षवर्धन ढवळे तसेच भिगवन परिसरातील नेते मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.

गाव पुढाऱ्यांनी गावामध्ये एकोपा व सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे-दत्तात्रय भरणे

माजी राज्यमंत्री विद्यमान आमदार दत्तात्रय यांनी मदनवाडी गावामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर पूर्णकृती पुतळ्याचे अनावरन व लोकार्पण सोहळा सोहळ्याच्या वेळी दत्तात्रय भरणे यांनी भाषणाच्या वेळी बोलताना सांगितले गावातील सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. गावात एकोपा जपला पाहिजे . निवडणूका येथील निवडणुका जातील त्यामुळे कोणीही एकमेकांवर रोष, राग न ठेवता गावाच्या विकासासाठी सहकार्य करून हा एकोपा जपण्याचे पाहिजे.तसेच गावातील सर्व समाजातील घटकांना एकत्र घेऊन काम केले पाहिजे. गावामध्ये भांडणे, कुरगुड्या, गट तट यामुळे गावाच्या विकासाच्या दृष्टीने घातक आहे. एक प्रकारे दत्तात्रय भरणे यांनी गावातील नेते मंडळी व पुढाऱ्यांच्या कान उघडण्या केल्याचे दिसत आहे.

तसेच गावातील आशा वर्कर,अशा सेविका,नवनियुक्त पोलीस भरती झालेल्या युवकांचा सत्कार करून सन्मान चिन्ह देण्यात आले.तसेच स्वर्गीय शंकर नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सदर सोहळ्याचे नियोजन मा. उपसरपंच राजेंद्र देवकाते, ग्रामपंचायत सदस्य अतुल देवकाते, हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष आनंद देवकाते यांनी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महादेव बंडगर सर यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!