June 30, 2025 6:56 pm

पंतप्रधानांच्या मन की बात संवादातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतला कार्यक्रमाचा लाभ, भाजपा मा. प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांची प्रमुख उपस्थिती

अपनी भाषा में पढ़े! Translate

पंतप्रधानांच्या मन की बात संवादातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतला कार्यक्रमाचा लाभ, भाजपा मा. प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांची प्रमुख उपस्थिती

शिरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची “मन की बात” या कार्यक्रमात पंतप्रधानांचा संवाद अतिशय एकचित्ताने ऐकत सर्वांनी आनंद व्यक्त करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावनेला साद घातल्याने आज खऱ्या अर्थाने पंतप्रधानाचा संवादाचा सेतू निर्माण झाला होता. शिरपूर येथील बबनराव चौधरी यांचा जनसंपर्क कार्यालयात रविवार दि. १८ जुन २०२३ रोजी कार्यकर्ता व पदाधिकार्‍यांसोबत मन की बात कार्यक्रम विभाग संयोजक तथा भाजपा मा. प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमाचा आनंद घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०२ व्या मन की बातच्या माध्यमातून बहुमूल्य मार्गदर्शन केले आहे. यावेळी मन की बात कार्यक्रम विभाग संयोजक तथा भाजपा मा. प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी सांगितले की, उपस्थितांनी प्रत्येक महिन्याला होणारी मन की बात कार्यक्रम ऐकण्याचा संकल्प केला पाहिजे तसेच मन की बात कार्यक्रम दर महिन्याचा शेवटचा रविवारी असतो परंतु शेवटचा रविवारी पंतप्रधान विदेश दौर्‍यावर आहेत म्हणुन प्रथमच असा बदल झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील यांनी हि मनोगत व्यक्त केले. शिवाय झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी निमित्त बबनराव चौधरी यांचा हस्ते प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, व्यापारी आघाडी मा. जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, अनु. जाती मोर्चा मा. जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, भाजपा मा. जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, भाजपा तालुका चिटणीस सुनिल चौधरी, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, शहर चिटणीस राधेश्याम भोई, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, शहराध्यक्ष नंदु माळी, भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राज सिसोदिया, शहर उपाध्यक्ष अनिल बोरसे, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष रविंद्र सोनार, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, शहराध्यक्ष रफीक तेली, बाराबलुतेदार महासंघ तालुकाध्यक्ष योगीराज बोरसे, शहराध्यक्ष रमेश चौधरी, शहर कोषाध्यक्ष सुभाष लोहार, शिवसेना (शिंदे सेना) शहर उपप्रमुख दिनेश गुरव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!