करमाळा प्रतिनिधी – दिनांक 10 मे 2023 रोजी नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केतुर २ ता.करमाळा जि.सोलापूर येथे एसएससी 1998 च्या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा व गुरुजन कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.यावेळी बॅचमधील बहुतांश विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.तसेच त्या काळातील शिक्षक श्री लक्ष्मण टाळके, सदाशिव यादव,काकडे सर,कळसाईत मॅडम,उपस्थित होते.सदर स्नेह मेळाव्यात अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील या प्रशालेचे महत्त्व सांगितले व काहीजण जुन्या आठवणीने भारावून जाऊन भावना विवश झाले. शाळेच्या इतिहासातील हा पहिलाच माजी विद्यार्थी मेळावा भव्य स्वरूपात झाला.यावेळी शाळेचे ऋण व्यक्त करताना सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या बागेमध्ये साधारणता एक लाख रुपयाचे पेवर ब्लॉक बसवून देण्याचे घोषित केले.या स्नेह मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रशालेचे प्राचार्य दिलावर मुलाणी सर यांनी भूषवले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किशोर जाधवर सर यांनी केले तसेच आभार माजी विद्यार्थी ग्रामसेवक कांबळे भाऊसाहेब यांनी मानले. सदर मेळाव्याचे नियोजन माजी सरपंच प्रवीण नवले,कांबळे भाऊसाहेब,महावीर राऊत,भूषण दोभाडा,दत्तात्रय पाठक यांनी केले.