तक्रारवाडी गावच्या सरपंचपदी मनीषा प्रशांत वाघ यांची निवड
(निलेश गायकवाड )
तक्रारवाडी गावच्या सरपंचपदी मनीषा प्रशांत वाघ यांची निवड झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी दीपक कोकरे यांनी दिली. माजी सरपंच सतीश विनायक वाघ यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होताच राजीनामा दिल्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.यावेळी सरपंच पदासाठी खुल्या प्रवर्गातून राणी नितीन काळंगे आणी मनीषा प्रशांत वाघ यांनी आपले अर्ज दाखल केले होते. राणी काळंगे यांना 4 तर मनीषा वाघ यांना 5 मते पडली.
अत्यंत चुरशीच्या आणी अटीतटी च्या निवडणुकी कडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते.आज झालेल्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी दीपक कोकरे ,ग्रामसेवक दीपक बोरावके ,तलाठी महादेव भारती यांच्या सह पोलीस पाटील अमर धुमाळ सहायक मिथुन शेलार यांनी कामकाज पाहिले. भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी यावेळी निवडणूक वेळी गावांत चोख पोलीस बंदोबस्त लावला होता.