July 1, 2025 4:57 am

स्वतःच्याच पत्नीचा पळवून नेऊन केला खून मृतदेह लोणारवाडीतील उसाच्या शेतात लपविला कस्टडीत असताना दिली कबुली.

अपनी भाषा में पढ़े! Translate

स्वतःच्याच पत्नीचा पळवून नेऊन केला खून मृतदेह लोणारवाडीतील उसाच्या शेतात लपविला कस्टडीत असताना दिली कबुली.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
दौंड – संतोष अहि-या पवार वय 28 वर्ष राहणार खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे यांने त्याची पत्नी सुरेखा वय 35 वर्ष खडकी तालुका दौंड हिला काही कारणाने मारहाण करून तिचा खून करण्याचे उद्देशाने तिला पळवून नेले होते. अशा प्रकारच्या मजकुराचे यातील फिर्यादी चंदाबाई भोसले राहणार कानडी तालुका आष्टी जिल्हा बीड यांनी दिले फिर्यादीवरून
दौंड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर424/2023 भा.दं.वि. कलम 364 अन्वये दाखल होता. आरोपीस अटक केले नंतर त्यांने पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याची पत्नी सुरेखा हीचा खुन करून तिचे प्रेत लोणारवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे गावचे हद्दीतील वाळुंजकर यांच्या मालकीचा जमीन गट नंबर 204/ 6 मध्ये असलेल्या ऊसामध्ये ठेवले असल्याचे सांगितल्याने सदर प्रेत तिचे नातेवाईक यांनी ओळखल्याने सदर गु न्हयास वाढीव भादवि कलम 302,201 हे लावण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी ही अंकित गोयल सो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, आनंद भोईटे अप्पर पोलीस अधीक्षक बारामती ,स्वप्निल जाधव सो उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग दौंड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील दौंड पोलीस , सहा पोलीस निरीक्षक अरविंद गटकुळ, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुंभार, पोलीस हवालदार सुभाष राऊत, पोलीस हवालदार मलगुंडे, पोलीस हवालदार थोरात, पोलीस हवालदार विठ्ठल गायकवाड, पोलीस हवालदार गावडे, पोलीस नाईक अमीर शेख, पोलीस नाईक शरद वारे, पोलीस नाईक शैलेश हंडाळ, पोलीस नाईक भागवत, पोलीस कॉन्स्टेबल सागर गलांडे,पोलीस कॉन्स्टेबल योगेश गोलांडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते. यांनी केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!