नरसिंह नवरात्र उत्सवानिमित्त श्रींची मिरवणूक( छबिना) या कार्यक्रमाने लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
निरा नरसिंहपुर: दिनांक – 6,प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
इंदापूर तालुक्यामधील तसेच पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून ओळखल्या जाणारे तीर्थक्षेत्र निरा नरसिंहपुर येथे नरसिंह जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रींची पालखी मिरवणूक असते यालाच छबिना असे म्हणतात. ही मिरवणूक रात्री नऊ वाजता चालू झाली. याच्यामध्ये वेगवेगळे मोर घोडे, डीजे व सनई चौघड्यांचे सुगम संगीत आणि विविध फटाक्यांची आतिषबाजी तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हे पाहण्यासाठी पंचक्रोशीतून तसेच इतर राज्यातून आलेल्या बऱ्याच भाविकांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी केली होती. अशा भव्य छबिण्याच्या कार्यक्रमाने लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. येथील विद्युत रोषणाई तसेच फटाक्यांची आतिषबाजी हे एक अद्भुत आणि अद्वित गोष्ट होती.
या कार्यक्रमांमध्ये निरा नरसिंहपुर यात्रा कमिटी तसेच लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट यांच्यातील सर्व सदस्य, नीरा नरसिंहपूरच्या विद्यमान सरपंच सौ. अश्विनी सरवदे ,उपसरपंच सौ. रेणुका काकडे, चंद्रकांत सरवदे, विठ्ठल देशमुख,अभय वांकर, दशरथ राऊत, विजय सरवदे, संतोष मोरे, हनुमंत काळे ,नरहरी काळे, अण्णासाहेब काळे, श्रीकांत दंडवते ,जगदीश सुतार, नितीन सरवदे ,अमर भोसले, किशोर मोहिते, पप्पू गोसावी, उमेश कोळी ,प्रशांत बादले पाटील, सचिन कदम, बापू जगदाळे,विलास ताटे, राजेंद्र निंबाळकर, आप्पा भोसले, डॉक्टर संदीप केसकर, डॉक्टर अरुण वैद्य, ह.भ.प. श्री.अंकुश रणखांबे महाराज,ह.भ.प.श्री.आनंद काकडे महाराज, विठ्ठल धोत्रे, सुरेश धोत्रे,मनोज मासुळे,अविनाश कोळी, दत्ता कोळी, प्रभाकर जगताप,अतुल घोगरे, अक्षय गोडसे ,शिवाजी गोडसे, संदीप पवार ,बळीराम गलांडे,बाळू काका काकडे, गोरख लोखंडे,राजेंद्र देशमुख, अरुण क्षीरसागर, नाथाजी मोहिते, एकनाथ सरवदे, आबा काळे, नानासाहेब देशमुख, इरफान शेख, धनंजय पवार, ब्रह्मजीत राजे भोसले ,रावसाहेब बादले पाटील, सुभाष जपे, मगनदास क्षीरसागर, कमलेश डिंगरे ,विजय गवळी, नंदकुमार डिंगरे,दिगंबर काका डिंगरे, धनंजय दुनाखे, प्रमोद दंडवते,मुकुंद देवळे, रवी काकडे, अविनाश दंडवते,बापू जगताप, कल्पेश कुलकर्णी, शंकर राऊत तसेच वेगवेगळ्या गावांमधून आलेले पाहुणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.