युवकांना संधी दिल्याने खऱ्या अर्थाने नव्या पर्वाला सुरुवात- कृष्णा शेळके
कृषी उत्पन्न बाजार समिती रणधुमाळी
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत~ ‘आ.रोहितदादा पवारांकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.असे असताना या निवडणुकीसाठी अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. जेष्ठ अनुभवी व निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबर जास्तीत जास्त युवकांना संधी दिल्याबद्दल आ. रोहितदादा पवार यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.रोहितदादांनी निवड केलेले हे उमेदवार शेतकऱ्यांसाठी विकासाची दूरदृष्टी, इच्छाशक्ती व कार्यक्षमता असून विकासात्मक नवीन क्रांती करतील’ असे मत भांबोरा- हिंगणगावचे माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते कृष्णा शेळके यांनी व्यक्त केले.
सहकार व शेतकरी विकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून आ. रोहित पवार यांनी ज्यांना-ज्यांना या निवडणुकीत उमेदवार म्हणून संधी दिली ते सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील व या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे अनेक कामे येणाऱ्या काळामध्ये आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली करतील असेही मत त्यांनी बोलताना व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि.२० रोजी उमेदवारी अर्ज माघार व निवड प्रक्रियेला दुपारी पूर्णविराम मिळाला. त्यानंतर अनेक भागात राजकीय समीकरणे सुरू झाली आहेत.आ.रोहित पवार हे युवकांचे आयडॉल आहेत व त्यांना मानणारा मतदारसंघातच नव्हे तर राज्यात मोठा तरुण वर्ग आहे.असे असताना आ. रोहित पवार निवडून आल्यानंतर अनेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा लागला आहे आणि विशेष म्हणजे मोठ्या संख्येने निवडून आलेले युवक ग्रामपंचायतीचा कारभार पाहत आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतही अधिकाधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास शेळके यांनी व्यक्त केला आहे.