June 30, 2025 2:41 pm

दौंड मध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

संविधान निर्मात्यांच्या जयंतीला सर्वधर्म समभाव दौंड शहरात एकत्र

प्रतिनिधि – विकी ओहोळ

मो. न.- 84-46-11-91-58

दौंड : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागील बाजूस भारताचे संविधानाच्या उद्देशिकाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. 14 एप्रिल दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी शहरातील भीमनगर गावठाण ,सिध्दार्थ नगर, शालीमार चौक,रेल्वे परिसर तसेच दौंड शहरातील विविध भागातून जयंती मंडळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली

मिरवणुका कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता व्यवस्थित पणे पार पडल्या यावेळी दौंड पोलीस स्टेशन मार्फत मोठ्या प्रमाणात शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता अनेक ठिकाणी डि जे साउंड सिस्टीम लावण्यात आले होते मिरवणुकीत हजारो भीम सैनिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या

अनेक ठिकाणी विविध संस्था, संघटना, भीम उत्सव समित्या यांचेकडून थंड पाणी तसेच आईस्क्रीम चे वाटप ही करण्यात आले. रात्री मिरवणुकीच्या वेळी दौंड शहराची एकात्मता दिसून आली यावेळी निळे,भगवे,हिरवे पिवळे झेंडे तसेच पंचशील ध्वज एकत्र आल्याचे दिसले.

अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आले तसेच काही संघटनांनी सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्याना भीम गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला,मोफत धान्य वाटप करण्यात आले .

14 एप्रिल दिवशी रात्री 12 वाजता सामुदायिक वंदना घेऊन जयंतीची सांगता करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ( पूर्णाकृती पुतळा) समिती व दौंड नगर परिषद दौंड यांचेकडून सर्वांचे स्वागत आणि आभार मानण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!