शिरपूर : शिरपूर शहर व तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा नेत्तृवाखाली करण्यात आले. आंदोलन करुन निषेध करण्यात आला. यावेळी राहुल गांधीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राहुल गांधी हे देशाचीची माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. शहरातील विजयस्तंभा जवळ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, व्यापारी आघाडी मा. जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस मंगेश भदाणे, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, नितीन राजपुत, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष लोटन पाटील, उपाध्यक्ष संजय आसापुरे, मा. नगर सेवक भुरा राजपुत, राधेश्याम भोई, रविंद्र भोई, मुबीन शेख, रफीक तेली, जाकीर तेली, राज सिसोदिया, विनायक कोळी, नंदु माळी, निलेश देशमुख, रविंद्र राजपुत, अनिल आखाडे, संतोष माळी, भाऊसाहेब कोळी, चंदु गुरव, हेमंत बोरसे, दिनेश पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्वाच्य भाषेत चोर म्हणून अपमानित करणाऱ्या राहुल गांधी यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली व लोकसभा सचिवलयाने खासदारकी रद्द केली आहे असे असतांना देखील न्यायालयाची व मोदी समाजाची माफी मागण्याऐवजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना हिरो करण्याचा प्रयत्नात आहे. जणू न्यायालयाने त्यांच्यावर फार मोठा अन्याय केला. त्यांनी ओबीसी समाजाला अपमानित करुन कुठलीही चुक केली नाही. अशा अर्विभावात ते बेताल वक्तव्य करीत आहेत. यामुळे भाजपा कार्यकर्ते यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपमानित करण्याचे काम राहुल गांधी यांच्याकडून झाले आहे व आजही काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपमानित करीत असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी सांगितले.