जागतिक महिला दिन आणि होळीचे औचित्य साधत सिटी प्राईड माॅल एंड मल्टिप्लेक्स, उत्सव प्यूर व्हेज एंड बॅन्क्व्येट, लक्ष्य सखी चेंबर ऑफ कॉमर्स, जायंटस् वेलफेअर फाउंडेशन, माहेश्वरी महिला मंडळ, पाटील महिला मंडळ, लिनेस क्लब आणि बडगुजर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इको फ्रेंडली होळीची मैत्रीणीं सोबत करू धमाल, करू Stress Management ने जीवनात कमाल!!!’ चे आयोजन करण्यात आले होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव विरहित जीवन आनंदाने, हसत खेळत, नवे रंग मिसळत कसे जगता येऊ शकते ह्याचे मोटिव्हेशनल स्पिकर आणि काउंसीलर साजीद पटेल सर यांनी उत्तम मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास कृतीबेन भूपेशभाई पटेल, सुहासिनी सोनवणे आणि कक्कूबेन पटेल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी मा. नगराध्यक्षा संगीता देवरे, वैशाली सोनवणे, ॠतूपर्णा सोनवणे, लक्ष्य सखी चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षा प्रिया पाटील, जायंटस् युनिट डायरेक्टर ज्योती सोनवणे, माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा भंडारी व सदस्या मीनाक्षी राठी, लिनेस क्लब अध्यक्षा डाॅ. नलिनी राठी, बडगुजर महिला मंडळाच्या अध्यक्षा डाॅ. वृषाली बडगुजर, आदि मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित महिलांसाठी विविध मनोरंजन, १ मिनिट गेमस् आणि गाण्यांवर थिरकत पर्यावरण पूरक फुलांची होळी उत्स्फूर्त पणे साजरी करण्यात आली. सूत्रसंचालन संचालन नेहा शिंपी यांनी केले. १ मिनीट गेमस् प्रियंका भंडारी आणि दिपाली भक्कड यांच्या व्दारे घेण्यात आले. कार्यक्रमास डाॅ. जयश्री निकम, ज्योती इंदवे, सरला बागूल, ज्योती रघूवंशी, रूपाली बाफना, कनीका सुखवानी, शुभांगी राठी,शितल बडगुजर आणि अनिता पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.