June 30, 2025 3:11 am

साप्ताहिक रयतेचा भीमप्रहार हा गोर गरिबांचा कणा असून तो समाजातील महत्त्वाचा दुवा आहे……!

अपनी भाषा में पढ़े! Translate

साप्ताहिक रयतेचा भीमप्रहार हा गोर गरिबांचा कणा असून तो समाजातील महत्त्वाचा दुवा आहे……!
साप्ताहिक रयतेचा भीमप्रहार द्वितीय वर्धापन दिनी आमदार दत्तामामा भरणे यांचे गौरव उद्गार.
निरा नरसिंहपुर: दिनांक; 21, प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे. वालचंद येथे 19 फेब्रुवारी 2023 रोजी साप्ताहिक रयतेचा भीमप्रहार याचे द्वितीय वर्धापन दिन प्रमुख मान्यवरांचा उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपल्या पेपरचा वर्धापन दिन साजरा करणारे भीमसेन उबाळे हे खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींचे कार्य विधायक कामातून लोकांपर्यंत पोहोचवताना दिसतात अशा शब्द सुमनांनी उपस्थितांनी वर्धापन दिन कार्यक्रमात कौतुकाची थाप दिली. साप्ताहिक रयतेचा
भीमप्रहार चा द्वितीय वर्धापन दिन कार्यक्रमाची सुरुवात इंदापूर तालुक्याचे कार्यक्षम आमदार श्री. दत्तामामा भरणे व उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच वीरयोद्धामाता सावित्रीबाई उबाळे, लोकनायक राजदत्त उर्फ आबासाहेब उबाळे यांच्या प्रतिमांचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार दत्तामामा भरणे यांना देण्यात आले यावेळी आपल्या प्रास्ताविक पर मनोगतामध्ये 19 फेब्रुवारी शिवजयंती या दिवशीच वर्धापन दिन घेण्याचे कारण मुख्य संपादक भीमसेन उबाळे यांनी विस्तृतपणे उपस्थितांसमोर विषद केले कार्यक्रमाच्या मध्यंतरी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विविध जिल्ह्यातील आलेले पत्रकार संपादक व सामाजिक कार्यकर्ते यांचा साप्ताहिक रयतेचा भीमप्रहार परिवारा वतीने समाज
न्याययोद्धा हा विशेष पुरस्कार व सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मानित करण्यात आले तसेच याप्रसंगी उत्कृष्ट महिला सरपंच,2023 हा विशेष पुरस्कार कळंब गावच्या सरपंच सौ. विद्या अतुल सावंत यांना तर उत्कृष्ट सामाजिक संस्था 2023 हा विशेष पुरस्कार कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांना कार्यक्षम आमदार दत्तामामा भरणे यांच्या हस्ते देऊन यांच्या निस्वार्थकार्याचा पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक आदर करण्यात आला. तसेच या सुंदर अशा कार्यक्रमाप्रसंगी माळशिरस तालुक्यातील धडाडीचे पत्रकार श्री. प्रमोद शिंदे, पत्रकार संरक्षण समितीचे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ सरवदे, सासवड येथील वृत्तपत्राचे संपादक श्री. पंकजदादा धिवार, ज्येष्ठ पत्रकार गोकुळबापू
टांकसाळे, यांनी आपल्या मनोगत मध्ये राजे शिवछत्रपतींच्या जयंतीचे औचित्य साधून साप्ताहिक रयतेचा भीम प्रहार परिवाराने घेतलेल्या द्वितीय वर्धापन दिन कार्यक्रमाचे विशेष कौतुक करून आजच्या विविधांगी पत्रकारितेचे समाजातील प्रत्येक घटकाशी असलेले नाते व त्याच्यातून निर्माण होणारे समाज हिताच्या बाजूंचे महत्त्व विस्तृतपणे विशद केले. या वर्धापन दिन कार्यक्रमास आपल्या व्यस्त आशा दिनचर्येतून इतरही प्रमुख मान्यवरांसह वालचंद नगर कंपनीचे ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजर श्री. मच्छिंद्र शिरसाठ साहेब यांनीही उपस्थित राहून आपल्या मनोगतामध्ये साप्ताहिक रयतेचा भीम प्रहार च्या कार्याचे कौतुक करून त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशी इच्छा व्यक्त करून त्यांच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांसह जेष्ठ पत्रकार गोकुळ टांकसाळे, पंकज दादा धिवार, प्रमोद शिंदे, संतोष दहिदुले, अमोल राजपूत, समाधान राजपूत, डॉक्टर सिद्धार्थ सरवदे, निलेश जाधव, संतोष कदम स्वप्निल कांबळे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते तुषार शिवपूजे, सुदाम जाधव, सरपंच नितीन सोनवणे, नवनाथ चितळकर, दादा पठाण यांचा समाज न्याय योद्धा हा 2023 चा विशेष पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन विशेष गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी माजी तंटामुक्त अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव उबाळे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकाळ, सुनील केंगार, आप्पा धीमधिमे, सागर जाधव, दत्ता भोसले, हर्षवर्धन उबाळे, महेश पवार, सुरज घोडके, अक्षय वाघमारे, दीपक वाघमारे, शिरीष कांबळे, दादा पठाण, शरीफ काळे, यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. वर्धापन दिन कार्यक्रमाचे नियोजनबद्ध सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक निलेश धापटे यांनी केले असून मान्यवरांचे आभार प्रतिनिधी पवार सर व इतर प्रतिनिधींनी मांडले.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात लोकांचे सहकार्य झाले असून कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट अशा स्नेहभोजनाने झाली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!