July 1, 2025 9:56 am

माहितीच्या अधिकारातून पंचायत समिती अमळनेर येथे लाखोंचा भ्रष्टाचार उघडकीस

अपनी भाषा में पढ़े! Translate

माहितीच्या अधिकारातून पंचायत समिती अमळनेर येथे लाखोंचा भ्रष्टाचार उघडकीस

माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांच्याकडून जनहितार्थ प्रसिद्द

अमळनेर -प्रतिनिधी – केंद्रीय पंचायत राज समितीच्या तर्फे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समिती स्तरावर राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान पेसा कक्ष अंतर्गत दोन दिवशीय सरपंच प्रशिक्षणासाठी शासनाकडून निधी पुरविला जात असतांना अमळनेर पंचायत समिती ला सन 2021-22 या कार्यकाळात जिल्ह्यात 1 नंबर वर निधी 7,57,899/- इतका निधी वर्ग करण्यात आला असतांना, GST बील न घेता लाखो रुपयांची रक्कम अदा करण्यात आलेली असून अस्तित्वात नसलेल्या टेंट हाऊस च्या नावे लाखो रुपयांची बील पास करून कोणतेही प्रशिक्षण न घेता, बनावट व खोटी कागदपत्रे सादर करून संपूर्ण रक्कम ही शासनाच्या खात्यातून काढून घेण्यात आली असल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी जनहितार्थ समोर आणला आहे. याबाबत अमळनेर पोलिसांत दि.26 डिसेंबर 2022 रोजी फिर्याद देण्यात आली असता सदर फिर्याद घेण्यास ठाणे अंमलदार यांनी नकार दिला होता. त्यामुळे सदर फिर्याद ही नोंदणीकृत डाकने अमळनेर पोलीस स्टेशनला पाठवली होती परंतु सदर फिर्याद अर्जावर कोणती कार्यवाही करण्यात आली हे देखील स्पष्ट केलेगेले नाही. त्यामुळे आज दि.20/02/2023 रोजी पुन्हा अमळनेर पोलिसांत प्राप्त झालेल्या माहितीनुसार फेर फिर्याद अर्ज देऊन जनतेच्या पैश्यांवर डल्ला मारणाऱ्या पराक्रमी अधिकारी कर्मचारी तसेच सदर विषयातील संबंधितांवर जनहितार्थ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा असा लेखी अर्ज वरिष्ठ प्राधिकरणासह ग्रामविकास विभाग व पंचायतराज समिती दिल्लीकडे पाठविला असल्याचेही योगेश पवार यांनी प्रेसनोट च्या माध्यमातून सांगितले आहे. तरी अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होईल काय ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!