July 1, 2025 10:56 am

तुकाईची शप्पथ घेऊन सांगतो, मी कुठंही कमी पडणार नाही – आमदार प्रा राम शिंदे

अपनी भाषा में पढ़े! Translate

तुकाईची शप्पथ घेऊन सांगतो, मी कुठंही कमी पडणार नाही – आमदार प्रा राम शिंदे

आपलं सरकार आलं आणि एका फोनवर सगळ्या परवानग्या मिळवल्या

तीन वर्षानंतर ते म्हणतात योजना पथदर्शी आहे, मग तीन वर्षे योजना का बंद ठेवली ? आमदार राम शिंदेंचा रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत: तीन वर्षे झाले बील आडवून धरलं, परवानग्या आडवून धरल्या,परत ते म्हणतात राज्यात एक नंबरचा प्रथमदर्शी प्रकल्प आहे, याच्यात राजकारण आणि आडमुठेपणा कोणी करू नये, पण तीन वर्षे कोणी आडमुठेपणा केलाय? तुम्हीच सांगा आता, असा सवाल उपस्थित करत आमदार प्रा राम शिंदे यांनी रोहित पवारांचे चांगलेच वाभाडे काढले.

आमदार प्रा राम शिंदे यांनी प्रतिष्ठा पणाला लावलेली तुकाई उपसा सिंचन योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद ठेवण्यात आली होती, राज्यात सत्तापालट झाल्यानंतर आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे या योजनेला पुन्हा गती आली आहे. योजनेसाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. सोमवार दि 13 फेब्रुवारी 2023 रोजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील आणि आमदार प्रा राम शिंदे यांच्यासह लाभक्षेत्रातील नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कर्जत तालुक्यातील वालवड येथे या योजनेच्या कामास पुन्हा सुरुवात झाली. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार प्रा राम शिंदे बोलत होते.

यावेळी आमदार राम शिंदे म्हणाले, तीन वर्षे म्हणले परवानग्याच नाही, अशीच चालू केली, फलानचं झालं, आरं केली, असचं चालू केली, परवानग्या नसताना 40 टक्के काम पुर्ण झालं, लोकांना माहित व्हतं आणि अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला माहित व्हतं, राम शिंदेय, काळजी करायचं कारण नाही, म्हणून योजनेचं 40% काम पुर्ण झालेलं होतं पण गेली तीन वर्षे जाणीवपूर्वक तुकाई उपसा सिंचन योजनेसंदर्भात आमदार रोहित पवारांनी अन्याय केला. ठेकेदाराचं बील दिलं नाही, योजनेचं काम बंद ठेवलं, परवानग्या मिळू दिल्या नाही, पण आपलं सरकार आलं आणि एका फोनवर सगळ्या परवानग्या मिळवल्या, आता योजनेचं पाणी पडेपर्यंत काम बंद होणार नाही, निधीची काळजी करू नका, तुकाईची शप्पथ घेऊन सांगतो, मी कुठंही कमी पडणार नाही, असे वचन आमदार प्रा राम शिंदे यांनी यावेळी बोलताना दिले.

तुकाई सिंचन योजना कसल्याही परिस्थितीत बंद होणार नाही, या योजनेचे काम सुरू असताना कोणाच्या शेतातून, बांधावरून जात असेल तर सहकार्य करा, ठेकेदाराला अधिकाऱ्याला सहकार्य करा, ही काय रिलायन्सवाल्याची पाईप लाईन नाही, त्यामुळं काहीही अपेक्षा करू नका, ही आपल्या पाण्याची योजना आहे, ही रिलायन्सची योजना नाही, त्यामुळं कोणीही काहीही आशाला लागू नका आणि काही मिळणारही नाही, आणि तुम्हाला सांगतो, तुकाईची शप्पथ घेऊन सांगतो, मी कुठंही कमी पडणार नाही, ही योजना कोणीही आडवू नका, हे काम आपल्याला पुर्ण करून दावायचयं, कोणी काहीही अफवा सोडीन, कोणी काहीही श्रेय घेईन, कोणाला काय श्रेय घ्यायचं ते घेऊ द्या, मी सहा वर्षाचा आमदार झालोय, योग्य वेळी योग्य काम दावणार आहे, त्याचं मला जजमेंट आलयं, मला सुध्दा सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात, त्यामुळं आपलं काम तुमच्यासाठी सुरूयं,त्यामुळं कोणीही आडवा आडवी करू नका, असे अवाहन यावेळी आमदार राम शिंदे यांनी केले.

तुकाई उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीनंतर कामाचा नारळही फोडला होता.पण ऐन निवडणुकीच्या काळात ही योजना टीकेचं लक्ष झाली, तुकाई योजना ज्या 19 गावांमधून जाते त्या गावांमधील एक गाव वगळता अन्य 18 गावांमध्ये मी 2019 च्या विधानसभेमध्ये मागे आहे. माझं सरकार पण गेलं, मी तुकाई चारी मंजुर करून देखील मला मतदान कमी पडलं, मग प्रश्न उपस्थित होतो, तुकाई उपसा सिंचन योजनेचं काम बंद का राहिलं ? काम यासाठी बंद राहिलं की कोणी म्हणायचं की ढेंगळ्याच्याच नळ्यात, कोण म्हणायचं सलाईनच्या नळ्यात. कोणी म्हणतं होतं असल्या फुकन्या असत्यात का ?, असं काय- काय म्हणून टीका करण्यात आली. पण ज्यांनी कामं केले, ज्यांनी सर्व राजकीय प्रतिष्ठा, मंत्रिपदाची प्रतिष्ठा पणाला लावली, वेळेत, कालमर्यादेत हे काम मंजूर केलं, त्याला काहीच आशिर्वाद, सहकार्य न देता अश्या पध्दतीचं काम केलं, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी खंत बोलून दाखवली.

यावेळी पुढे बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, आढळगाववरून जामखेडला जो रस्ता जातो तो वनविभागाच्या हद्दीतून जातो, मग तो रस्ता आगोदर सुरू झालाय का तुकाई योजना सुरू झालीय? मग त्याला मंजुरी मिळाली तर ह्याला मंजूरी का मिळाली नाही? तुकाई चारीमध्ये राजकारण आणि आडमुठेपणा घेऊ नये, महाराष्ट्रातली हा पथदर्शी एक नंबरचा प्रकल्पय असा मजकूर असलेली आमदार रोहित पवार यांची पोस्ट पाहिली, वाह रे पठ्ठ्या.. हेच आयकायचं व्हतं तीन वर्षाने आम्हाला.. मग तीन वर्षे योजना मार्गी लावायला अडचण काय होती? असा सवाल उपस्थित करत आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांना चांगलेच फटकारले.

 

22 गावांचा प्रश्न सोडवल्याचं मला मानसिक समाधान आहे, मी अतिशय समाधानीय, पण मीबी काय कमी नाही, मागच्या दाराने आलोच , तुकाई चारीचा नाद मिटवायसाठीच आलोय, आल्याबरोबर तुकाई चारीला मंजुरी घेतलीच, एकाच फोन दिली मंजूरी, एकाच फोनवर, मी तर सत्ताधारी पक्षाचा मागच्या दाराचा आमदारय, तुम्ही सांगता ना आमचं सरकार व्हतं, मग ते विकास काम आडवायसाठी होतं का? त्यामुळं माणूस आपला तो आपलाच असतो हे ध्यानात ठेवा, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी पुन्हा एकदा भावनिक साद घातली.

 

परत म्हणत्येत गडी मागच्या दाराने आलाय, त्याचं काय आयकायचं, गडी मागच्या दाराने जरी आला असला, काम पुढच्या दाराचं दाखिवत्योय आता, आपली सुध्दा कामं म्हणले आम्हीच आणली, आढळगाव ते जामखेड, अहमदनगर- सोलापुर 2 हजार कोटी आम्हीच आणलं, बोलाचाच भात अन बोलाचीच कढी, वाॅटसअप अन फेसबुक रेटून चलायचं, आता मी आमदार झाल्यापासून कोणाला व्हाईस काॅल आलाय का? बंद झाला का नाही तसला खेळ, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्ला चढवला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!