July 1, 2025 10:10 am

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राची जिम्नास्ट संयुक्ता काळेला चार सुवर्णपदकं

अपनी भाषा में पढ़े! Translate

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राची जिम्नास्ट संयुक्ता काळेला चार सुवर्णपदकं

मध्‍य प्रदेशात सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत काल दोन नवे राष्ट्रीय विक्रम नोंदले गेले. दिल्लीच्या सोनमने २०० मीटर ची अडथळा शर्यत केवळ ६ मिनिटं ४५ सेकंदाच्या विक्रमी वेळेत पूर्ण केली, तर राजस्थानच्या सिद्धार्थ चौधरीने २१ पूर्णांक ४ शतांश मीटर लांब गोळाफेक करून नवा विक्रम नोंदवला. महाराष्ट्राची अव्वल जिम्नॅस्ट संयुक्ता काळेने काल ४ सुवर्ण पदकांसह एकूण ५ पदकं पटकावली. संयुक्ताने मागच्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतही ५ सुवर्ण पदकं जिंकली होती.

या स्पर्धेच्या अॅथलेटिक्स प्रकारातल्या मुलांच्या स्पर्धेत मध्य प्रदेशाच्या खेळाडूंनी तर मुलांच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदक पटकावलं. त्यामुळे २६ सुवर्ण पदकांसह एकूण ७९ पदकं पटकावणारा महाराष्ट्र पदक तालिकेत अग्रस्थानी असून २२ सुवर्ण पदकांसह एकूण ५३ पदकं पटकावणारे हरियाणा दुसऱ्या स्थानी तर २१ सुवर्ण पदकांसह एकूण ५३ पदकं पटकावणारा यजमान मध्य प्रदेश तिसऱ्या स्थानी आहे.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या आजच्या सातव्या दिवसापासून जल क्रीडा प्रकारातली कॅनो स्ल्यालम स्पर्धा सुरु होणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!