खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून दौंड मध्ये एका युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न,
कीटकनाशक जास्तीचे प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू
प्रतिनिधी – विकी ओहोळ
दौंड – शहरातील एका तरुण व्यापाऱ्याने खासगी सावकारांच्या जाचाला आणि मारहाणीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. विशाल दुमावत याची प्रकृती चिंताजनक होती. यानंतर या व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी दोन महिलांसह एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सावकार नीलिमा गायकवाड, बाबू शेख, नाडी भय्या, राजू सूर्यवंशी, मुन्नी काझी, टिल्लू काझी, निखिल पळसे, रूपेश जाधव व एक अनोळखी व्यक्ती अशा एकूण नऊ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड शहरातील जुने भांड्याचे व्यापारी विशाल शांतिलाल दुमावत यांनी 29 जानेवारी रोजी सकाळी कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कीटकनाशक घेण्यापूर्वी त्याने मोबाईल फोन मध्ये खासगी सावकारांचा नामोल्लेख करून त्यांच्याकडून झालेला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास व्हिडिओच्या माध्यमातून केला होता. दुकानासाठी नऊ खासगी सावकारांकडून तब्बल 25 लाख रुपये व्याजाने घेतले होते
त्यांनी मुद्दल व्याजाची रक्कम रोख, ऑनलाईन पद्धतीने दिल्यानंतरही संबंधित सावकार दुकानात येऊन दमदाटी आणि शिवीगाळ करीत आणखी पैशांची मागणी करीत होते. त्याचबरोबर विशाल यास मारहाण करून कोरे धनादेश व मुद्रांकावर सह्यासुद्धा घेतल्या होत्या. त्यामुळे खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून विशाल याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे त्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.