July 1, 2025 5:54 am

रोटरी क्लबच्या हॅप्पी स्कूल प्रोजेक्टचा हस्तांतर सोहळा…

अपनी भाषा में पढ़े! Translate

रोटरी क्लबच्या हॅप्पी स्कूल प्रोजेक्टचा हस्तांतर सोहळा…

(निलेश गायकवाड )

रोटरी क्लब पुना वेस्ट व रोटरी क्लब भिगवन यांच्या संयुक्त विद्यमाने हॅप्पी स्कूल प्रोजेक्ट हा ग्लोबल ग्रँड च्या अंतर्गत घेण्यात आला होता.. यामध्ये भिगवन व परिसरातील एकूण आठ शाळांना विविध शैक्षणिक साहित्य देण्यात आले होते.. याचा हस्तांतर सोहळा आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वामी चिंचोली येथे श्री शितल शहा डी. जी. एन. डिस्ट्रिक्ट 3131 यांच्या शुभहस्ते तसेच श्री.संतोष मराठे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ग्लोबल ग्रँड, श्री.चारू क्षोत्री डिस्ट्रिक्ट डायरेक्टर सिनर्जी तसेच श्री. वसंतराव माळुंजकर हॅपी व्हिलेज डिस्ट्रिक्ट डायरेक्टर, श्री.निखिल मुथा असिस्टंट गव्हर्नर, रोटरी क्लब भिगवनचे संस्थापक अध्यक्ष श्री. सचिन बोगावत,रोटरी क्लब भिगवन चे अध्यक्ष डॉ.अमोल खानावरे,माजी अध्यक्ष श्री.संजय खाडे,उपाध्यक्ष श्री. किरण रायसोनी, सेक्रेटरी सौ. वैशाली बोगावत,खजिनदार श्री. संतोष सवाणे, तसेच रोटरी क्लब पुना वेस्ट चे श्री राजेश राऊत,श्री. विपिन घाटे,श्री. निरंजन मथुरे,श्री. हरपाल कोहली,श्री. विश्वास सप्रे,श्री.संतोष चिपळूणकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला..
यावेळी बोलताना श्री शितल शहा म्हणाले की ग्रामीण भागातील सर्व रोटरी क्लब एकत्र येऊन अशा प्रकारचे प्रोजेक्ट भविष्यात करणे गरजेचे आहे. रोटरी क्लब च्या मार्फत आजच्या ग्रामीण भागातील शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना विविध शालेय उपयोगी साहित्य पुरविण्याचे प्रयत्न भविष्यात देखील रोटरी क्लबच्या माध्यमातून नक्कीच करण्यात येतील असे आश्वासन देतो.. यावेळी बोलताना श्री चारु क्षोत्री म्हणाले की मागील वर्ष 2021-22 रोटरी क्लब भिगवन च्या विनंतीला मान देऊन आम्ही या सर्व शाळांमध्ये भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी विविध शैक्षणिक साहित्याची कमतरता आहे,असे जाणविले त्यामुळे रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट व ग्लोबल ग्रँड उपक्रमांतर्गत हे सर्व साहित्य देण्यात आले यामध्ये विविध शाळांमध्ये ई लर्निंग सेट, स्मार्ट टीव्ही,ग्रीन बोर्ड,लायब्ररी साठी कपाट तसेच पुस्तके,वॉटर फिल्टर,खेळाचे साहित्य, टेबल खुर्च्या, बेंच , इन्व्हर्टर, साऊंड सिस्टीम इत्यादींचा समावेश आहे..
रोटरी क्लब भिगवन चे माजी अध्यक्ष श्री. संजय खाडे म्हणाले की आपल्या ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी येथील मुलांना विविध शैक्षणिक साहित्य देण्याची गरज आहे असे लक्षात आल्यानंतर आम्ही रोटरी क्लब व पुना वेस्ट बरोबर हा प्रोजेक्ट करून शाळेतील भौतिक व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी हे सर्व जवळपास 22.5 लक्ष रुपयांचे हे साहित्य रोटरी क्लबच्या माध्यमातून देण्यात आले…
रोटरी क्लब भिगवन चे अध्यक्ष डॉ.अमोल खानावरे म्हणाले की आत्ता चांगले शिक्षण हा आयुष्यातील आताच्या काळाचा पाया आहे. पुढील काळात ज्ञानाला महत्त्व येणार आहे म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक ज्ञान मिळावे यासाठी रोटरी क्लबचा हा एक प्रयत्न आहे…
कार्यक्रमासाठी रोटरी क्लब भिगवन चे श्री.संजय चौधरी,श्री. रियाज शेख,श्री.नामदेव कुदळे, श्री.संपत बंडगर, बिल्ट कंपनी चे श्री.बाळासाहेब सोनवणे,श्री. प्रदीप ताटे, सौ.निशिगंधा कुदळे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.रामचंद्र शेंद्रे,स्वामी चिंचोली सरपंच प्रतिनिधी मच्छिंद्र मदने व गावातील विविध मान्यवर उपस्थित होते… कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रोटरी क्लब भिगवन चे संस्थापक अध्यक्ष श्री सचिन बोगावत यांनी केले… कार्यक्रमाचे नियोजन श्री.रणजित भोंगळे, श्री. औदुंबर हुलगे,श्री निखिल बोगावत यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका सौ.रणमोडे मॅडम यांनी मानले….

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!