रुई येथील श्री बाबीर देवस्थानचा कलशारोहण सोहळा १३ सप्टेंबर रोजी; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार
(निलेश गायकवाड)
रुई (ता. इंदापूर) – रुई येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री बाबीर देवस्थानचा कलशारोहण सोहळा रविवार दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे.
या कलशारोहण सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा.ना. दत्तात्रय (मामा) भरणे हे भूषविणार आहेत.
शुभहस्ते – उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क, ग्रामविकास आणि महिला व युवक कल्याण मंत्री मा.ना.श्रीम. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडणार आहे.
प्रमुख उपस्थिती
या सोहळ्यास राज्यातील अनेक दिग्गज नेते प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार आहेत.
मा. श्री. बाळासाहेब थोरात (मा. महसूल मंत्री), मा. श्री. हर्षवर्धन पाटील (मा. सहकार मंत्री), मा. श्री. विश्ववल बाबा जगदाळे (अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे), मा. श्री. गोपीचंद पडळकर (आमदार), मा. श्री. पृथ्वीराज बापू जाचक (चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती), मा. श्री. प्रविण (भैय्या) माने (मा. सभापती, बांधकाम विभाग जि.प. पुणे), मा. श्री. भरत शहा (नगराध्यक्ष इंदापूर), मा. श्री. आप्पासाहेब जगदाळे (संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक), मा. श्री. राहुल दादा कुल (आमदार दौंड), मा. श्री. उत्तमराव जानकर, मा. श्री. डॉ. सुधीर तांबे (मा. आमदार विधान परिषद), मा. श्री. महादेव जानकर, मा. श्री. यशवंततात्या माने (मा. आमदार मोहोळ), मा. श्री. विश्वासराव देवकाते, मा. श्री. दीपक बापू करगळ (राष्ट्रवादी काँग्रेस पुणे), मा. श्री. नारायण आबा पाटील (आमदार करमाळा), मा. श्री. प्रदीपदादा गारटकर (भाजप नेते, इंदापूर तालुका), मा. श्री. प्रताप (आबा) पाटील (मा. सदस्य, जिल्हा परिषद पुणे), मा. सौ. अंकिताताई पाटील ठाकरे (सभापती महिला व बाल कल्याण जि.प. पुणे) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या भव्य दिव्य सोहळ्यास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त ग्रामस्थ रुई व बाबीर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.